Dq6fGJ_U0AAN_6m

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यात भारताचा विजय

क्रीडा

एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात भारताने वेस्ट इंडीजवर 9 गडी राखत पाच सामन्यांची मालिका आपल्या नावावर केली आहे. रोहित शर्माच्या नाबाद 63 आणि विराट कोहलीच्या नाबाद 33 धावांच्या जोरावर विंडीजचं 105 धावांचं आव्हान भारतानं 14.5 व्या षटकातच पार केलं.
दरम्यान वेस्टइंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय गोलदांजीसमोर वेस्टइडींजचा संघ 31.5 षटकांत सर्वबाद 104 धावांच करू शकला. वेस्ट इडींज फलंदाजीत जेसन होल्डर याने सर्वाधिक 25 तर मार्लन सैम्युल्सने 24, रोवमन पाॅवेलने 16 धावा केल्या.
भारतीय गोलंदाजीत रविंद्र जडेजा याने सर्वाधिक 4 बळी घेतले. खलील अहमद, जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 2 तर कुलदीप यादव आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *