divakar-ravte

रस्ता बघुन चाला ! परिवहनमंत्री दिवाकर रावतेंचा सततच्या अपघातांवर अजब सल्ला

महाराष्ट्र मुंबई राजकीय

मुंबई : भाजप-शिवसेनेच्या सरकारमधील मंत्र्यांना झालंय तरी काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आता महाराष्ट्राच्या जनतेवर आली आहे. कधी कुठला मंत्री कुठल्या प्रश्नावर कसा वागेल अन काय बोलेल याचा ताळतंत्रच राहिलेला नाही.

वाचाळवीर मंत्र्यांच्या यादीत आता परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भर पडली आहे. शिवसेनेचे हे जेष्ठ नेते आपल्या विविध निर्णयांमुळे अगोदरच अडचणीत आलेले आहेत. त्या अडचणीत ते आपल्या फटकळ व असंवेदनशील बोलण्याने आणखी भर घालताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील रस्ते अपघात हा सर्वांचा चिंतेचा विषय आहे. याबाबत त्यांना मंगळवार ३० ऑक्टोबर रोजी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न होता देशभरात होणा-या अपघातात महाराष्ट्र राज्याचा तिसरा क्रमांक असून यावर उपाययोजना काय करत आहात. अतिशय सरळ साध्या असलेल्या या प्रश्नाचे उत्तरही तितकेच संवेदनशील असणे गरजेचे होते. पण याबाबत दिवाकर रावतेंनी दिलेले उत्तर मुर्खपणाचा कळस गाठणारे होते. तसेच ते सामान्य जनतेला डिवचणारं होतं. त्यांचं म्हणणं असे आहे की, नागरिकांनी रस्ता बघत चालावं. दिवाकर रावते यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्याकडून अशा असंवेदनशील उत्तराची अपेक्षा नव्हती.

अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या लांब पल्ल्याच्या व उत्पन्न देणा-या गाड्या बंद करण्याचा निर्णय त्यांनी का घेतला हेच अजून जनतेला समजलेले नाही. त्यातच त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात आणलेल्या खासगी शिवशाही बसेस वादाच्या भोव-यात आहेत. या बसेसचे मागील वर्षभरात दोनशेपेक्षा जास्त अपघात झाले आहेत. यात जीवित व वित्त दोन्हींची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. त्यामुळे आता प्रवाशी या बसेसमध्ये बसताना अनेकदा विचार करत आहेत. असे असताना प्रवाशांना दिलासा देण्याचे सोडून त्यांच्या या उत्तराने नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार दिसून येत आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *