best

मुंबईकरांना यंदा दिवाळीसाठी ‘बेस्ट ‘च्या जादा गाड्याची भेट

महाराष्ट्र मुंबई

मुंबई : दिवाळीनिमित्त मुंबईकरांना ‘बेस्ट’ भेट देण्यात आली आहे. दिवाळी खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बाजारपेठांमध्ये ये-जा करत असतात. दादर, वांद्रे, वाशी या परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर होणारी ये-जा पाहता त्यांच्या सोयीसाठी ३१ आॅक्टोबरपासून बेस्टकडून या भागात १८ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच भाऊबीजनिमित्तही पश्चिम उपनगर, मीरारोड, ठाणे भागात एकूण १३६ बसगाड्या सोडण्यात येतील.

वीर कोतवाल उद्यान-प्लाझा, दादर, वांद्रे, महात्मा फुले मार्केट, काळबादेवी, ए.पी.एम.सी मार्केट, वाशी आदी भागात ३१ आॅक्टोबर ते ५ आॅक्टोबर दरम्यान १८ बसगाड्या सोडण्यात येणार आहे. ९ आॅक्टोबर भाऊबीजनिमित्त मुंबई शहर, पूर्व-पश्चिम उपनगर, मीरारोड, भार्इंदर, मॅरेथॉन चौक (ठाणे), कोपरी (ठाणे), कॅडबरी जंक्शन (ठाणे), रेतीबंदर-कळवा तसेच वाशी, नवी मुंबई, कोपरखैराणे, नेरूळ, ऐरोली, घणसोली गाव, सीबीडी बेलापूर आदी ठिकाणी जाणा-या विविध बसमार्गावर एकूण १३६ बस सोडण्यात येणार आहेत. जास्त गर्दी असणा-या बसस्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी बस थांब्यावर, रेल्वे स्थानकाबाहेरील बसस्थानकावर बसनिरीक्षकांची तसेच वाहतूक अधिका-यांची नेमणूक करण्यात येणार आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *