anti-corruption

महिला अर्थिक विकास महामंडळाकडून मर्जीतील अधिकार्‍यांचाच आर्थिक विकास ; ‘ काम न करताही मिळाले वेतन ‘

कोकण महाराष्ट्र मुंबई
सातारा : महिला अर्थिक विकास महामंडळाने तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत विभागीय सनियंत्रण व मुल्यमापन अधिकारी पद निर्माण केले व थेट रिझनल रिसोर्स पर्सन पदावर नियुक्ती केली. परंतु काम न करता किमान पाच अधिकार्‍यांना महामंडळाकडून वेतन अदा केल्याने खळबळ माजली आहे. महिलांऐवजी मर्जीतील अधिकार्‍यांचा आर्थिक विकास पुणे विभागात झाला असून सध्या सदर अधिकारी मराठवाडा विभागात कार्यरत असल्याच्या माहितीला दुजोरा मिळाला आहे. अधिकार्‍यांनी घेतलेले सदर वेतन सव्याज परत करावे, या मागणीसाठी आता आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र जगताप यांनी दिला आहे.
महाराष्ट्र महिला अर्थिक विकास महामंडळाच्या पुणे विभागात रिजनल रिसोर्स पर्सन पदावर नियुक्ती करण्यात आली. या पदावर काम करणार्‍या अधिकार्‍याला ३७ हजार ६२३ दरमहा असे अकरा महिन्याच्या करारानुसार वेतन अदा केले. या नेमणुकीसाठी कोणत्याही वृत्तपत्रात जाहिरात प्रसिध्द केली नाही. अर्ज मागवले नाहीत. तसेच इच्छुक उमेदवारांकडे किंवा स्वयंरोजगार केंंद्राकडे मागणीही केली नाही. महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी सिध्दराम माशाळे यांची एकाच पदावरून दुसर्‍या पदावर नियुक्ती केली. विशेष म्हणजे करारनामा संपुष्टात आल्यानंतर  ४ एप्रिल २०१८ रोजी पुन्हा त्यांची नियुक्ती केली. ही नियुक्ती करताना ५ एप्रिल २०१८ ला कार्यालयीन आदेशानुसार एका दिवसाच्या विनंती अर्जानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्यांना रूजू व्हावे असा कार्यालयीन आदेश दि. ५ एप्रिल २०१८ रोजी काढण्यात आला. या आदेशावर व्यवस्थापकीय संचालक इंद्रा मालो यांची स्वाक्षरी आहे.
सध्या व्यवस्थापक संचालक बदलला असल्याने ही बाब उघडकीस आणली गेली आहे. या प्रकरणामुळे महिला अर्थिक विकास महामंडळात महिलांचा अर्थिक विकास होतो की, मर्जितील अधिकारी आपल्या जवळच्या अर्थिक विकास करतात? याचे आता कोेडे पडले आहे.
रिजनल रिसोर्सचे काम काय?
ग्रामीण भागात लघु व्यवसायासाठी महिला बचत गटांना खुप मेहनत घ्यावी लागते. त्यांना महिला अर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती दिली जात नाही. अशावेळी रिजनल रिसोर्सचे काम काय? असा सवाल महिला वर्गातून उपस्थित केला जात आहे. याबाबत महिला अर्थिक विकास महामंडळाने ग्रामीण भागात सर्वेक्षण करून खर्‍या गरजू महिला वर्गाला लघु उद्योगासाठी अर्थ सहाय्य केले तरच हे महामंडळ महिलांसाठी आदर्श ठरेल, अशा शब्दात महिला उद्योजीका अमृता माने यांच्यासह अनेक महिला उद्योजकांनी प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.
Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *