India-West-Indies-PTI

भारताने उडवला वेस्ट इंडिज चा धुव्वा; मालिकेत आघाडी

क्रीडा देश

मुंबई : चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा २२४ धावांनी पराभव केला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामनात प्रथम फलंदाजी करत भारताने ३७७ धावांचे मोठे आव्हान वेस्ट इंडिजसमोर ठेवले. पण वेस्ट इंडिजच्या संघाला भारताने १५३ धावांवर गुंडाळत शानदार विजय मिळवला. या विजयामुळे भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली आहे.

भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा याने १६२ धावांची खेळी केली. तर अंबाती रायुडूनेही शतक केले. या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ५ गडी गमवत वेस्ट इंडिज समोर ३७७ धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरा दाखल उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. पहिले तीन फलंदाज फक्त २० धावांवर तंबूत परतले. विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर यांने सर्वाधिक ५४ धावा केल्या. तो नाबाद राहिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *