Asha-Bhosle-with-A-Band-Of

आशा भोसले यांनी गायले, ‘दिल सरफिरा’

मनोरंजन

‘बँड ऑफ बॉईज’ने प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्या सदाबहार व मंत्रमुग्ध आवाजात स्वरबद्ध केलेले ‘दिल सरफिरा’ या गाण्याचे नुकतेच अनावरण केले. यावेळी आशा भोसले यांची नात झनाईसह बँडचे करण ओबेरॉय, चिंटू भोसले, शेरिन वर्गीस आणि डॅनी फर्नांडिस तसेच अनुजा भोसले आणि आनंद भोसले उपस्थित होते. ‘बँड ऑफ बॉईज’बद्दल आशा भोसले यांनी म्हटले की, ‘‘ब्रँडमधील सर्वजण खरोखर चांगले गातात. मी त्यांना २००१ मध्ये त्यांच्या पहिल्या शोमध्ये मी त्यांना नाचत- नाचत गाताना पाहिले होते आणि आजदेखील ते पूर्वीप्रमाणेच नाचले व तितकेच सुंदर गायले.’ सध्या मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या पर्यावरण संरक्षणाच्या चळवळीचा एक भाग म्हणून आशा भोसले व झनाई भोसले या आजी-नाती जोडीने #PlantTree ही नवीन चळवळ सुरू केली आहे. संगीताच्या वारशाबरोबर समाजाप्रति कर्तव्याचे संस्कारदेखील एका पिढीकडून दुस-या पिढीकडे दिले जात असल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आशा भोसले व झनाई भोसले आहेत. आपल्या प्रत्येक कामामध्ये आजीचे सहकार्य मिळत असल्याबद्दल झनाई हिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. झनाई भोसले सांगते की, ‘‘भोसले कुटुंबाचा एक भाग आहे, याबद्दल मी स्वत:ला नशीबवान समजते. खडतर आयुष्य जगणा-या मुलींकडे पाहते, त्यावेळी मला आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावे, असे सतत वाटत असते. मला निसर्गाबद्दलही प्रचंड प्रेम आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *