Nitesh-Rane

आमदार नितेश राणेंचे मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकरांना पत्र; मच्छीमारांचे प्रश्न सोडविण्याची मागणी

कोकण महाराष्ट्र मुंबई

कणकवली : देवगड बंदरातील मच्छीमारी करणा-याचे विविध प्रश्न सोडविण्याची मागणी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. मच्छीमारांच्या दैनदिन जीवनाशी संबंधित या मागण्या असल्याने त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कार्यवाही करावी असे आमदार राणे यांनी म्हटले आहे.

शेतकरी खावटी कर्जमाफीप्रमाणेच मच्छीमारांनी घेतलेले थकित खावटी कर्जमाफ करावे. डिझेल कर परतावा संस्थेस एप्रिल २०१७ व सप्टेंबर २०१७ पासून पुढील सर्वच महिन्यांचा नियमतपणे वेळच्या वेळेवर प्राप्त व्हावा. मत्स्यव्यवसाय खात्याचे अधिकारी डिझेल कर परतावा वितरण हे एनसीडीसी नौकांना ६० टक्के व इतर सर्व नौकांना ४० टक्के अशा प्रमाणात करणार आहेत ही पध्दत रद्द करावी व पुर्वीप्रमाणे सर्व नौकाधारकांना समान डिझेल कर परतावा वितरण व्हावे. मत्सव्यवसाय खात्याचे अधिकारी डिझेल कर परतावा थेट संबंधित मच्छीमारांच्या बँक खात्यात जमा करणार आहेत. हा नियम रद्द होऊन पुर्वीप्रमाणे तो संबंधित सहकारी संस्थेच्या बँक खात्यात जमा व्हावा. जेणेकरुन संस्थेची कर्ज वसुली होणे साईचे होईल. जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी एक कोल्ड स्टोअरेज असावे. जेथे विक्री न होणारे मासे साठवता येतील व एकत्र विकता येतील.

परराज्यातील नौकांची घुसखोरी व अनधिकृत मासेमारी बंद होण्यासाठी कडक उपाययोजना व्हावी. आनंदवाडी जेटी प्रकल्पाचे काम चालु व्हावे व तो वेळीच पुर्णत्वास जावा. मच्छीमारांनी पकडलेल्या मासळीस योग्य दर मिळावा म्हणून जिल्ह्यात एक सुसज्ज मासळी विक्री बाजार निर्माण व्हावा, अशा मागण्या आमदार नितेश राणे यांनी मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्याकडे केल्या आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *