bjp

भाजपचा राहुल गांधी यांना सवाल तुमचे गोत्र कोणते?

राजकीय

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे गोत्र कोणते, असा प्रश्न भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी उपस्थित केला आहे. राहुल गांधी हल्लाबोल करताना पात्रा यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.

राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात पुजा केल्यानंतर पात्रा यांनी हा हल्लाबोल केला. राहुल गांधी हे जानवे घालतात. हे जानवे नेमके कोणत्या पध्दतीचे आहे. त्यांचे गोत्र कोणते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस नेते शशी थरुर यांनी पंतप्रधानांचा विचू असा उल्लेख केल्यानंतर भाजपने त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. गुजरात निवडणुकीच्या काळातही राहुल गांधींनी शिवमंदिराला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी आपण शिवभक्त असल्याचा दावाही केला होता. काँग्रेसने हिंदूंना नेहमीच दुय्यम दर्जाच्या नागरित्वाची वागणूक दिल्याचा आरोपही पात्रा यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *