Naal-Trailer1

दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओज् यांची जुळली ‘नाळ’

मनोरंजन

‘फँड्री’ आणि ‘सैराट’ चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर ‘झी स्टुडिओज्’ आणि नागराज पोपटराव मंजुळे ‘नाळ’ नावाचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून येत्या १६ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

सुधाकर यांनी ‘सैराट’, ‘विहीर’, ‘देऊळ’ अशा सिनेमांचे छायाचित्रीकरण केले आहे. ‘नाळ’मधून ते दिग्दर्शनात पाऊल ठेवत आहेत. ‘नाळ’ चित्रपटाच्या ट्रेलरचे नुकतेच अनावरण झाले. यावेळी नागराज मंजुळे, दिग्दर्शक सुधाकर रेड्डी, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी या कलाकारांसह झी स्टुडिओज्चे सीईओ शरीक पटेल, बिजनेस हेड मंगेश कुलकर्णी, कन्टेन्ट हेड अश्विनीकुमार पाटील आदी उपस्थित होते. सेवा चव्हाण, ओम भुतकर आणि बालकलाकार श्रीनिवास पोकळे यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

जगात सुंदर असे एकच मूल आहे आणि ते प्रत्येक आईपाशी आहे. अशाच एका आई आणि मुलाची ही गोष्ट आहे. लहानगा चैतन्य (चैतू) आठ वर्षाचा आहे. नदीच्या काठी वसलेल्या महाराष्ट्रातील एका खेडय़ात तो राहतो. त्याचे वडील गावातील एक प्रतिष्ठित जमीनदार आहेत. ते चैतूचे सगळे हट्ट पुरवतात. प्रेमळ आणि मायाळू आई त्याचे खूप लाड करते. अशा सुंदर वातावरणात वाढणा-या चैतन्यच्या भावविश्वाचा अनपेक्षित प्रवास ‘नाळ’च्या कथासूत्रात उलगडताना दिसेल. ‘नाळ’सारखा सिनेमा ख-या अर्थाने चित्रभाषेत बोलू शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *