daud bro

दाऊदच्या भावाला दिलेल्या ‘बिर्याणी’ मुळे झाले पाच पोलिस निलंबित.

महाराष्ट्र मुंबई

ठाणे : खंडणी प्रकरणात अटकेत असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला ‘स्पेशल ट्रीटमेंट’ देणा-या पाच पोलीस कर्मचा-यांचे निलंबन करण्यात आले आहे. ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी ही निलंबनाची कारवाई केली. यात एक पोलीस उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबलचा समावेश आहे. इकबाल कासकर एका खासगी गाडीत बसून बिर्याणी खात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पवार, कॉन्स्टेबल पुंडलिक काकडे, विजय हालोरे, कुमार पुजारी आणि सुरज मानवार यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

कासकर सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहात असून गुरुवारी त्याला ठाणे सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले होते. यावेळी इकबाल कासकर एका खासगी गाडीत बसून बिर्याणी खात होता, असा व्हिडीओ गुरुवारी व्हायरल झाला. या व्हायरल झालेल्या व्हिडीओची गंभीर दखल घेत ठाणे पोलिसांनी चौकशी करत कासकरला ठाणे कारागृहातून ते रुग्णालयापर्यंत नेणारे पोलीस कर्मचारी यासाठी जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढत निलंबनाची कारवाई केली. चौकशीदरम्यान कासकरला विशेष वागणूक दिली असल्याचे उघडकीस आले आहे.

सहपोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी निलंबनाची कारवाई करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इकबाल कासकर याला ठाणे पोलीस खंडणी विरोधी पथकाचे प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *