sunil-tatkare-1-324x160

कोकणाचे नेतृत्व करीत असलो तरी सहकार रुजवू शकलो नाही: आ.सुनील तटकरे यांनी दिली कबुली

कोकण महाराष्ट्र मुंबई राजकीय

चिपळूण : आम्ही कोकणाचे नेतृत्व करीत असलो तरी सहकार रुजवू शकलो नाही. हे काम चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने केले आहे, ही बाब कौतुकास्पद आहे, अशी कबुली आ. सुनील तटकरे यांनी दिली आहे. शेती व शेतीपूरक व्यवसायाला चालना दिल्याशिवाय देश उभा राहू शकत नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

पश्चिम महाराष्ट्रात सहकार राबविला गेला. कोकणातील चिपळूण नागरी पतसंस्थेने पश्चिम महाराष्ट्रात पाऊल ठेवण्याचे मोठे धाडस केले आहे. चिपळूण नागरीने सभासद संख्या, स्वनिधी, भागभांडवल, ठेवी असा प्रचंड डोलारा केला आहे. दुसरीकडे राष्ट्रीयकृत बॅँकांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले आहेत. तर चिपळूण नागरीने गेल्या २५ वर्षात चोख पध्दतीने पारदर्शक व्यवहार केला. इतकेच नव्हे तर सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केला. याचबरोबर चिपळूण नागरी गरजू कर्जदाराला २४ तासात कर्ज मंजूर करून अर्थपुरवठा करते, ही बाब उल्लेखनीय आहे. वसुलीदेखील योग्य पध्दतीने असल्याने एनपीएचा रेशो उत्तम आहे. सहकाराचे जाळे विणत असताना पतसंस्था विश्वासार्हता कसोशीने जपण्याचा प्रयत्न करीत आहे. हेच या संस्थेचे यश आहे, असे गौरवोद्गार आ. सुनील तटकरे यांनी काढले.

ते पुढे म्हणाले की, अन्य जिल्हा बॅँकेच्या तुलनेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील बँका नक्कीच एक पाऊल पुढे आहेत. चिपळूण नागरी पतसंस्थेने रायगड जिल्ह्यासह मुंबईत पाऊल ठेवावे. एकंदरीत चौफेर वाटचाल करावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. यावेळी व्यासपीठावर सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आ. संजय कदम, सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, चिपळूण नागरीचे चेअरमन सुभाष चव्हाण, व्हाईस चेअरमन सूर्यकांत खेतले, संचालक अशोक कदम, संचालिका स्मिता चव्हाण, अ‍ॅड. नयना पवार, श्रीधर मोरे, अशोक साबळे, गुलाब सुर्वे, चंद्रकांत चव्हाण, सत्यवान म्हामुणकर, सोमा गुढेकर, राजेश वाजे, रवींद्र भोसले, संचालिका निलिमा जगताप, तज्ज्ञ संचालक राजेंद्र पटवर्धन आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला माजी आ. रमेश कदम, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, मुख्याधिकारी वैभव विधाते, भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, जि.प. सदस्य राजेंद्र आंब्रे, माजी जि.प. सदस्य अजय बिरवटकर, कुमार शेट्ये, प्रकाश शिगवण, राजू जाधव, समीर जानवलकर, राजू कदम, नगरसेविका फैरोजा मोडक, शिवानी पवार, स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे, राष्ट्रवादीचे दादा साळवी, चिपळूण तालुकाध्यक्ष अजय साळवी, नगरसेवक परिमल भोसले, वैभव वीरकर, राष्टÑवादीचे चिपळूण तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, माजी सभापती शौकत मुकादम, प्रकाश राठोड आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले. संचालक अशोक कदम यांनी आभार मानले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *