murdera_57989ca0e97fc

नाचणाऱ्या तरुणाची खिल्ली उडवणे पडले डान्स शिक्षकाला महाग

देश

दिल्लीतील वाल्मिकी मंदिराजवळ ही घटना घडली आहे.गुरुवारी वाल्मिकी जयंती निमित्त मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सर्व भाविक नाचत होते. अविनाश सांगवान हा डान्स शिक्षक असलेला तरुण त्याच्या काही मित्रांसोबत आला होता. त्यावेळी तिथे एक पैलवान व्यक्ती नाचत होता. अविनाश त्या व्यक्तीकडे बघून हसला व त्याची खिल्ली उडवली. त्यामुळे तो व्यक्ती वैतागला व त्याने अविनाशला धक्काबुक्की केली. त्यानंतर तो तेथून निघून गेला. अविनाश मात्र तेथेच त्याच्या मित्रांसोबत नाचत होता. काही वेळाने तो पैलवान व्यक्ती परत आला आणि त्याने बेभान नाचत असलेल्या अविनाशला जवळून गोळी मारली.
गोळीचा आवाज झाल्याने सर्वजण नाचता नाचता थांबले. थोडा वेळ अविनाशलाही समजले नाही की काय झाले पण नंतर सदर काढल्यानंतर त्याला छातीवर त्याला कुणीतरी गोळ्या घातल्याचे समजले. त्यानंतर अविनाशच्या मित्रांनी त्याला तत्काळ रुग्णालयात नेले मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *