varun759

कुली नं १’ सिनेमाचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला

मनोरंजन

अभिनेता गोविंदाने त्याच्या करियरमध्ये वरूण धवनचे वडील डेविड धवन यांच्यासोबत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. या दोघांच्या नंबर वन सीरिज चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाल केली होती. या नंबर वन सीरिजपैकी ‘कुली नं १’ चित्रपट खूप लोकप्रिय ठरला होता. आता या सिनेमाचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दिग्दर्शत डेविड धवन यांना त्यांचे नंबर वन सीरिज पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आणायचे आहेत. याची सुरूवात ‘कुली नं १’ सिनेमापासून होणार आहे. या चित्रपटाच्या रिमेकमध्ये गोविंदाच्या भूमिकेत अभिनेता वरूण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार असून चित्रपटाची नायिकाही लवकर फायनल करण्यात येणार आहे. ‘कुली नं.१’ चित्रपट १९९५ मध्ये प्रदर्शित झाला होता. यातील गाणे हिट ठरले होते आणि चित्रपटाला प्रेक्षकांचाही प्रतिसाद मिळाला होता. यामुळेच याचा रिमेक बनविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *