c2e55aab7e017a71e8c1c33dc3a18123

आलोक वर्मा यांची चौकशी दोन आठवड्यात पूर्ण करा, सर्वोच्च न्यायालयचाआदेश

देश

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी सक्तीच्या रजेवर पाठवल्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी आदेश देताना केंद्रीय दक्षता आयोगाने या प्रकरणाची चौकशी १४ दिवसात पूर्ण करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ही चौकशी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए.के.पटनायक यांच्या देखरेखीखाली होईल. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयचे हंगामी संचालक एम. नागेश्वर राव यांना धोरणात्मक निर्णय घेण्यापासून रोखले आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई केली आहे.
फक्त प्रशासकीय प्रमुख नागेश्वर असतील असे मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी सांगितले. राव यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांनी जे जे निर्णय घेतले आहेत ते सर्व कोर्टासमोर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दिवाळीनंतर १२ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी सुनावणी घेईल असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *