vk

वेस्ट इंडिजने रोखला भारतचा विजयी रथ,दुसरी वनडे ‘टाय’

क्रीडा देश

विशाखापट्टणम : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील दुसरी एकदिवसीय क्रिकेट लढत बरोबरीमध्ये सुटली. रंगतदार सामन्यात शेवटच्या चेंडूवर वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी पाच धावांची आवश्यकता होती. मात्र उमेश यादवच्या गोलंदाजीवर शाइ होप याने चौकार लगावताना संघाला बरोबरी साधून दिली. तसेच भारतालाही विजयापासून रोखले.

३२२ धावांचे आव्हान असून वेस्ट इंडिजने भारताला जशास तसे प्रत्युत्तर दिले. त्याचे श्रेय शिमरॉन हेटमीयर (९४ धावा) तसेच शाइ होप (नाबाद १२३ धावा) यांना जाते. हेडमीयरचे सलग दुसरे शतक अवघ्या ६ धावांनी हुकले. त्याने ६४ चेंडूंत ९४ धावांची झटपट खेळी केली. त्यात ४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे. तो बाद झाल्यानंतर होपने पाहुण्यांच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. त्याने दुसरे शतक ठोकले. त्याच्या १३४ चेंडूंतील १२३ धावांच्या नाबाद शतकामध्ये १० चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे.

तत्पूर्वी, भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ६ बाद ३२१ धावा केल्या. त्यात कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद १५७ धावांच्या खेळीचा सिंहाचा वाटा आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *