tanaji

‘सैराट’फेम तानाजी गळगुंडे (लंगड्या ) आता दिसणार ‘माझा अगडबम’मध्ये

मनोरंजन

सुपरहिट ‘सैराट’ चित्रपटामध्ये ‘परश्या आर्ची आली..’ अशी साद घालणा-या लंगडय़ा प्रदीपची भूमिका जगभर गाजवणारा तानाजी गालगुंडे आगामी ‘माझा अगडबम’ या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा मोठय़ा पडद्यावर महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. अभिनेता सुबोध भावे आणि तृप्ती भोईर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘माझा अगडबम’ सिनेमामध्ये तानाजी हा ‘वजने’ नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. दहा वर्षापूर्वी तुफान प्रसिद्धी मिळवणा-या ‘अगडबम’ सिनेमाचा दमदार ‘सिक्वेल’ ‘माझा अगडबम’च्या निमित्ताने प्रदर्शनासाठी तयार आहे. यात तानाजी हा नाजुकाच्या मित्राची भूमिका करताना दिसून येणार आहे.

पेन इंडिया कंपनीचे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत ‘अगडबम’ सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन तृप्ती भोईर हिचे आहे. टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा आणि अक्षय जयंतीलाल गडा अशा चांगल्या निर्मात्यांची फळी ही चित्रपटाची जमेची बाजू आहे. रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांनी सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. येत्या शुक्रवारी (२६ ऑक्टोबर) सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या ‘माझा अगडबम’ सिनेमामध्ये तानाजी हा नाजुकासोबत काय धम्माल करतो, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *