1a684ffb63acc1e1e9b924bd35875c40

‘हिंदू धर्म आवडत नाही,मुलुंडमधून तरुण गायब

मुंबई

हिंदू धर्म आवडत नाही, मला इस्लाम धर्म स्वीकारायचा आहे, असं फोनवर बोलून मुंबईचा तरुण घरातून पळून गेला आहे. जगदीश परिहार असं या तरुणाचं नाव आहे.
23 वर्षीय जगदीश मुलुंडचा रहिवासी आहे.वाणिज्य शाखेत शेवटच्या वर्षात जगदीश शिकतोय. मंगळवारपासून तो बेपत्ता आहे. तो पाकिस्तान किंवा आखाती देशांमध्ये पळून गेल्याचा संशय आहे.फेसबुकद्वारे तो एका पाकिस्तानी तरुणीच्या संपर्कात होता. जाताना त्याने आपलं फेसबुक अकाऊंट डिलीट केलं असून सर्व डाटा उडवला आहे.तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी मंगळवारी मुलुंड पोलीस ठाण्यात दिली.
सध्या मुलुंड पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक या घटनेचा तपास करत आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *