vrk

विराट चा आणखी एक नवा विक्रम ,जगातील पहिला फलंदाज, २१३व्या सामन्यात केला दहा हजार धावांचा टप्पा पार

क्रीडा देश

विशाखापट्टणम : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टणममध्ये सुरू आहे. या सामन्यात विराट कोहलीने त्याच्या वैयक्तिक २१३व्या लढतीत आणि २०५व्या खेळीत दहा हजार धावांचा टप्पा पार केला. विराटने अॅश्ले नर्सच्या गोलंदाजीवर हा नवा विक्रम केला. विराट हा कमीत कमी सामन्यांमध्ये दहा हजार धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

आजवर केवळ १२ फलंदाजांना वनडेमध्ये दहा हजार किंवा त्याहून धावा फटकावता आल्या आहेत. त्यात अव्वलस्थानी विक्रमवीर सचिन तेंडुलकर (४६३ सामन्यांत १८,४२६ धावा) आहे. विराट भारतीय फलंदाजात दहा हजार धावा करणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, सौरव गांगुली आणि राहुल द्रविडनेही दहा हजार धावा काढणा-या क्रिकेटपटूंमध्ये नाव नोंदवले आहे. दहा हजारी मजल मारणारा १२वा खेळाडू भारताचाच म्हणजे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे. त्याने ३२४ सामन्यांत १०,१२३ धावा काढल्या आहेत. माजी कर्णधार सौरव गांगुली (३११ सामन्यांत ११,३६३ धावा) आणि माजी कर्णधार राहुल द्रविडनेही (३४४ सामन्यांत १०,८८९ धावा) दहा हजार धावा काढणा-या क्रिकेटपटूंमध्ये नाव नोंदवले आहे. आता विराट कोहलीला या ‘चौकडी’च्या पंक्तीमध्ये बसण्याची संधी मिळाली आहे.

विराट कोहलीसाठी दुसरी वनडे अविस्मरणीय ठरली आहे. दहा हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला अवघ्या ८१ धावांची आवश्यकता होती. विराटने २१३ वनडे सामने खेळताना अवघ्या २०५ डावात दहा हजार धावा केल्या आहेत. यात त्याने ३६ शतक आणि ४९ अर्धशतक झळकावली आहेत. विराटचा सर्वोच्च स्कोर १८३ धावा आहे. विराटने ९२.४९ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली असून त्याची सरासरी ५९.०७ अशी आहे.

मात्र, तत्पूर्वी विराटने घरच्या मैदानावर आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. विक्रमवीर सचिन तेंडुलकर आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. विराटने घरच्या मैदानावर ४००० धावा करण्याचा विक्रम नावावर केला आहे. त्याने ७८ डावांमध्ये हा पल्ला पार केला. या विक्रमात तेंडुलकर ६९७६ धावांसह आघाडीवर आहे. तेंडुलकरने १६० डावांमध्ये हा पल्ला गाठला. तर धोनी ४२१६ धावांसह दुस-या क्रमांकावर आहे. त्याने १०७ डावांमध्ये हा पल्ला पार केला.

वन डेत सर्वाधिक वेगवान दहा हजार धावा करणारे क्रिकेटपटू

विराट कोहली – २०५ इनिंग
सचिन तेंडुलकर – २५९ इनिंग
सौरव गांगुली – २६३ इनिंग
रिकी पाँटिंग – २६६ इनिंग
जॅक कॅलिस – २७२ इनिंग
महेंद्र सिंह धोनी – २७३ इनिंग
राहुल द्रविड – २७९ इनिंग

वन डेत दहा हजारांपेक्षा जास्त धावा करणारे क्रिकेटपटू

सचिन तेंडुलकर – १८४२६
कुमार संगकारा – १४२३४
रिकी पाँटिंग – १३७०४
सनथ जयसूर्या – १३४३०
महेला जयवर्धने – १२६५०
इंझमाम उल हक – ११७३९
जॅक कॅलिस – ११५७९
सौरव गांगुली – ११३६३
राहुल द्रविड – १०८८९
ब्रायन लारा – १०४०५
तिलकरत्ने दिलशान – १०२९०
महेंद्र सिंह धोनी – १०१२३vrk

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *