ajit dada

संविधान बचाव मेळाव्याआधी सुप्रिया सुळे-अजित दादांनी मारला औरंगाबाद येथील इम्रती-भजीवर ताव

रोजगार

औरंगाबाद – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी संविधान बचाव मेळावा आयोजित करण्यात आला आहेयानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते सोमवारपासून शहरात दाखल झाले आहेतमंगळवारी दुपारी १२ वाजता येथील संत तुकाराम नाट्यगृहात संविधान बचाव मेळावा होणार आहेतत्पूर्वी मंगळवारी सकाळी खासदार सुप्रिया सुळेमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील मुख्य बाजारपेठ गुलमंडी येथे फेरफटका मारलाऔरंगाबातची प्रसिद्ध इम्रतीवर बहिण भावांनी ताव मारलात्यानंतर औरंगाबाद बुक डेपो येथे काही मासिक आणि नियतकालिकांची खरेदी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत आज संविधान बचाव– देश बचाव मेळावा होत आहेया मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलखासदार सुप्रिया सुळेमाजी उपमुख्यमंत्री अजित पवारविधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित राहाणार आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *