raj

मदनराजे गायकवाड यांची राज ठाकरेंनी केली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

महाराष्ट्र मुंबई राजकीय

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पश्चिम विदर्भ दौ-यावर असून बुधवारी ते बुलढाणा येथे दाखल झाले. यावेळी शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पक्ष आढावा बैठकी दरम्यान दिवाळी नंतर नवीन कार्यकारिणीची नेमणुक करणार असल्याचे राज यांनी सांगितले. तसेच मदनराजे गायकवाड यांची बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आले असल्याचे राज यांनी जाहीर केले.

आगामी निवडणुका लक्षात घेत मनसेने रणशिंग फुंकले आहे. १७ आॅक्टोबरपासून राज पश्चिम विदर्भ दौ-यावर आहेत. शहरी भागांसोबत त्यांनी ग्रामीण भागांकडेही लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षविस्तार लक्षात घेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नवी फळी उभारणे हे त्यांचे मुख्य उद्दीष्ट आहे. अमरावती, वणी, यवतमाळ, वाशिम, अकोला या भागात राज यांनी कार्यकर्ते, पदाधिका-यांच्या बैठका घेतल्या. राजकीय-सामाजिक मुद्यांबाबत चर्चा करत या भागातील गावक-यांशी ते संवाद साधत आहेत. तरुणांच्या समस्याही जाणून घेत आहेत.
बुधवारी राज यांचा ताफा बुलढाण्यात दाखल झाला. राज यांच्या स्वागतासाठी मनसैनिकांची गर्दी झाली होती. पुष्पगुच्छ देत येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राज यांचे स्वागत केले. यावेळी शासकीय विश्रामगृहात राज यांची पदाधिका-यांसोबत बैठक पार पडली. कार्यकर्त्यांनी यावेळी त्यांच्या कामाचा अहवाल राज यांच्याकडे सादर केला.
………………………
राज यांनी घेतले गजानन महाराज समाधी स्थळाचे दर्शन


राजकीय दौ-यासोबत राज ठाकरे यांचे देवदर्शनही चालू आहे. अमरावतीमध्ये असताना राज यांनी अंबादेवीचे दर्शन घेतले होते. बुधवारी सकाळी राज यांनी शेगाव येथील गजानन महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी बाळा नांदगावकरही त्यांच्यासोबत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *