pa

पीएंच्या मानधनावर आमदार मारताहेत डल्ला !!

महाराष्ट्र मुंबई राजकीय
मुंबई : आमदारांच्या पीएंना विधीमंडळांकडून 25 हजार रुपये प्रतीमहा मानधन दिले जाते. पण या मानधनातील काही वाटा आमदार काढून घेतात. राज्यातील अनेक आमदार अशा पद्धतीने आपल्याच पीएंच्या खिशात हात घालत असल्याची माहिती सूत्रांनी ‘प्रहार वेब टीम’ला दिली.
मुंबईमध्ये राहणा-या पीएंना 25 हजार रूपयांमध्ये आपला खर्च भागविणे शक्य होत नाही. निवास, भोजन, आमदारांचा शासनासोबत करावा लागणारा पत्रव्यवहार, झेरॉक्स, स्टेशनरी इत्यादीसाठी पीएंचा खर्च होत असतो. त्यामुळे 25 हजार रूपये ही रक्कम तुटपुंजी आहे. अशातच आमदार या 25 हजारातील काही रक्कम काढून घेतात, हे अतिशय अयोग्य असल्याचे गा-हाणे काही पीएंनीच ‘प्रहार वेब टीम’कडे मांडले.
आमदारांकडून पीएंचे मानधन घेण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. काही आमदार स्वत:साठीच काही रक्कम घेतात. ब-याच आमदारांकडे दोन पीए असतात. एक पी.ए. मुंबईत, तर दुसरा मतदारसंघात असतो. पण विधीमंडळाकडून एकाच पीएला मानधन देण्याची तरतूद आहे. त्यामुळे एका मानधनांची रक्कम दोन पीएंमध्ये वाटली जाते. काही आमदार या रकमेचे तीन भाग करतात. दोन भाग दोन पीएंसाठी आणि तिसरा भाग स्वत: आमदारासाठी असे वाटप केले जाते.
काही दिलदार आमदार मात्र पीएच्या मानधनातील एक दमडीही घेत नाहीत. उलट स्टेशनरी व प्रवास खर्चासाठी अतिरिक्त रक्कम देतात. पण असे मोठ्या मनाचे आमदार फार थोडे आहेत. पीएंच्या मानधनावर डल्ला मारणा-या आमदारांचीच संख्या जास्त आहे. अशी नाराजी या पीए मंडळींनी ‘प्रहार वेब टीम’कडे व्यक्त केली.
Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *