nilesh-vikhe

निलेश राणे यांचाविखे पाटलांना सवाल ; पक्ष विसरलात की नेता ?

मुंबई राजकीय
मुंबई : “साहेब, पक्ष विसरलात की नेता ?” असा खोचक सवाल महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस आणि माजी खासदार निलेश राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अजीजीने स्वागत करणारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच शिर्डी दौऱ्यावर आले होते. यावेळी पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या गृहप्रवेशाचा कार्यक्रम मोदी यांच्याहस्ते झाला होता. राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. स्वागत करताना विखे पाटील यांच्या चेहऱ्यावरील अजिजीचे भाव लक्ष वेधून घेत होते. सध्या हा टीकेचा विषय झाला आहे. मोदींशी जवळीक साधून विखे काय साध्य करणार आहेत, असा सवाल नेटकऱ्यांतून केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *