jue

‘बिग बॉस’नंतर आता जुई गडकरी दिसणार ‘वर्तुळ’ मालिकेत

मनोरंजन

 

अभिनेत्री जुई गडकरी रिएलिटी शो बिग बॉसनंतर लवकरच छोट्या पडद्यावर दिसणार आहे. ती ‘वर्तुळ’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका 19 नोव्हेंबरला झी युवा वाहिनीवर प्रसारीत होणार आहे.
जुई गडकरी ‘पुढचं पाऊल’ मालिकेतील सोज्वळ सूनेच्या भूमिकेतून घराघरात पोहचली. या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. त्यानंतर ती ‘सरस्वती’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात ती सहभागी झाली होती. या शोमधून तिने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले. जवळपास ती दोन महिने बिग बॉसच्या घरात होती. या शोमधून बाहेर पडल्यानंतर ती युरोप टूरवर मोठ्या कालावधीसाठी गेली होती. या टूरवरून आल्यानंतर आता ती पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी सज्ज झाली आहे. आता ती झी युवा वाहिनीवर दाखल होत असलेल्या ‘वर्तुळ’ मालिकेत दिसणार आहे. ही हॉरर मालिका असून या मालिकेतदेखील ती सूनेच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेबाबत ती खूप उत्सुक आहे. या मालिकेचा प्रोमो जुईने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि लिहिले की, ‘माझ्या नव्या मालिका ‘वर्तुळ’चा प्रोमो शेअर करत आहे. ही मालिका तुम्हाला आवडेल, अशी आशा आहे. असेच तुमचे माझ्यावरील प्रेम व विश्वास कायम राहू दे.’

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *