IMG-20181023-WA0053.jpg

किशोर धारिया – महाडच्या इतिहासातील अनेक सामाजिक उपक्रमाचे प्रणेते व सामाजिक नेतृत्व

अग्रलेख कोकण

२४ ऑक्टोबर जलनायक किशोरजी धारिया यांचा वाढदिवस, महाडच्या इतिहासातील अनेक सामाजिक उपक्रमाचे प्रणेते व सामाजिक नेतृत्व…
२४ ऑक्टोबर १९९६ साली महाडमध्ये वनराईचे संस्थापक पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली हिरवळ संस्थेचे संस्थापक व पर्यावरण, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक अनेक उपक्रमाचे प्रणेते यांचे कार्यावलोकन…
जलसाक्षरता व जलसंचयन क्षेत्रातील कार्य :
• महाड तालुक्यातील वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून ‘ पाणी आडवा व पाणी जिरवा’ कार्यक्रमांतर्गत महाड तालुक्यातील २०० पेक्षा अधिक वनराई बंधाऱ्यांची पूर्तता .

• रायगड जिल्ह्यातील महिला बचत गटांमध्ये जलसाक्षरतेकरिता तसेच कृषीक्षेत्रातील जलनियोजनाकरिता विविध उपक्रमांचे नियोजन व जनजागृती अभियान .

• तालुका महाड मधील मौजे वरंध येथील कृषी धरणांतील गाळ काढुन धरणांची उंची वाढवून पाण्याची उपलब्धता वाढवून ६० हेक्टर भुईमूग लागवडीखालील क्षेत्र सुमारे १२५ हेक्टरपर्यंत वाढविण्यास यशस्वी प्रयत्नांची वाटचाल .

• महाड शहरातील पिण्याच्या पाण्यासाठी कै. मा. अरुणभाई मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरूड धरणातील पाणी महाड शहरापर्यंत पोहचवण्यासाठी यशस्वी अभियान .

• कै. डॉ. मोहन धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पर्यावरण प्रेमी गटांची नोंदणी करून जलसाक्षरतेकरिता यशस्वी अभियान .

• डॉ. मोहन धारिया गांधारी नदी पुर्नविकास प्रकल्प अभियानाचे प्रणेते, २० पेक्षा जास्त बंधारे बांधून गांधारी नदीचा पुनर्विकास आणि २२ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न, जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली, जलसंपदा मंत्री मा. श्री. गिरीशजी महाजन व स्वागताध्यक्ष मा. श्री. प्रवीण दरेकर (अध्यक्ष, मुंबई बँक)
आमदार श्री भरतशेठ गोगावले ,यांच्या उपस्थितीत जल यात्रेचे यशस्वी आयोजन .

• जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील नद्यांच्या पुर्नविकासाकरिता अभियानाची आखणी व यशस्वी सुरुवात .

• ग्रामपातळीवर ग्रामपंचायतीद्वारा होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेतील पाणीपुरवठ्याकरिता स्वच्छता केंद्रांच्या उभारणीकरिता शासनाकडे पाठपुरावा .

• किल्ले रायगडावरील पर्यटक व शिवभक्तांना शुद्ध व थंड पाणी मिळण्याकरिता जलशुद्धीकरण यंत्रांची यशस्वी सुरुवात .

• महाड शहरात येणाऱ्या पुराच्या पाण्यासंदर्भात व पुरानंतर स्वच्छतेसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा.

• संपूर्ण कोकणामध्ये जलसाक्षरतेची सुरुवात करण्याकरिता दि. १६ जानेवारी २०१६ रोजी मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन (जलसंपदा मंत्री) यांच्या अध्यक्षतेने व जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाने जलचेतना अभियानाचा प्रारंभ व पहिले टप्यात गांधारी, जगबुडी, अर्जुना, व जानवली या चार नद्यांचा पुर्नविकास आराखडा तयार करून कामास प्रारंभ .

• महाड तालुक्यातील डोंगरमाथ्यावर असणाऱ्या माझेरी गावांस आदर्शगाव म्हणुन प्रभावशाली सुरुवात या माध्यमातुन माझेरी गावांतील जलसंचय व जलनियोजन अभियानास प्रारंभ व माथा ते पायथा पाणी अडविणे व पाणी जिरविणेकरीता समांतर सर, दगडी बंधारे गॅबियन बंधारे बांधण्यास आदर्शगाव योजनेखाली सुरुवात

• रायगड जिल्ह्यातील डिस्ट्रिक्ट रिसोर्स ऑरगनायजेशन (DRO) म्हणून हिरवळ संस्था कार्यरत असून त्या माध्यमातुन वसुंधरा पाणलोट क्षेत्रातील पाणलोट समितीचे सदस्य व सचिव यांचे प्रशिक्षण कार्यक्रमांची रायगड जिल्ह्यात यशस्वीरीत्या पूर्तता.

• वसुंधरा पाणलोट विकासातील अधिकृत प्रशिक्षण संस्था (P. I.) म्हणून नेमणूक होऊन जिल्ह्यातील अनेक गावांत क्षमता बांधणी व जलसाक्षरता कार्यक्रमाचे नियोजन व पूर्तता

• किल्ले रायगडच्या पायथ्याशी वसलेल्या राजमाता जिजाऊ यांचे निवासस्थान म्हणून ऐतिहासिक महत्व असलेल्या पाचाड गावी ग्रामपंचायत पाचाड यांच्या माध्यमातुन सन २००२ मध्ये पहिल्या पाणी पुरवठा योजनेची आखणी व त्याकरिता पाचाड येथील ऐतिहासिक तलाव स्वच्छता मोहीम व पाणीपुरवठा योजनेची पूर्तता.

* वनराई संस्थेचे कोकण व मुंबई विभागाचे प्रमुख व वनराई फॉउंडेशनचे उपाध्यक्ष

* महाड को- ऑप बॅंकचे इलेक्शन बिन विरोध करण्यास प्रवृत्त करून दहा लाखांपेक्षा अधिक रक्कम गावांतील सार्वजनिक कार्याकरिता वापर .

* महाड येथील वीर रेल्वे स्टेशनवर कोकणरेल्वेच्या गाड्या थांबविण्यासाठी श्री. किशोर भाई यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी आंदोलन,वीर – महाड स्थानकावर रेल्वे थांबण्यास सुरुवात.

* धरणांमुळे बंद झालेला महाड भोर महामार्ग सुरु होण्याकरिता श्री. किशोर भाईंच्या नेतृत्वाखाली भोर व महाड तालुक्यातील यशस्वी सर्वपक्षीय जनआंदोलन व महामार्ग सुरु

* होळीच्या सणाला ओली झाडे जाळू नये याकरिता कोकणामध्ये होळी सणाला झाडे वाचवा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

*महाराष्ट्र भूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचा भव्य समाज भूषण पुरस्कार तत्कालीन मुखमंत्री श्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते १० लाखाच्या श्री सदस्य व लोकांच्या उपस्थितीत संपन्न व कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता १७ वर्षां पूर्वी कोकणातील यावशवंतराव चव्हाण मुक्त विदयापीठाचे हार्डवेअर -नेटवर्किंग कोर्सेस चा शुभारंभ *

* कोकण मराठी साहित्य परिषदेचा सर्वोत्तम संमेलन स्वागताध्यक्ष, अध्यात्म आणि साहित्य या विषयांवर आधारित कोकण साहित्य परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय पदमश्री आप्प्पासाहेब धर्माधिकारी ,आदरणीय श्री सचिनदादा धर्माधिकारी व शास्त्रज्ञ मा. श्री. विजय भटकर,साहीत्य श्रेष्ट्य मा .मधू मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत सर्वोत्तम संमेल्लनाची सार्तता

* १५ वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्याचे पहिले हार्डवेअर नेटवर्क कॉम्पुटर कॉलेज (कॉलेज ऑफ इंटरनॅशनल इन्फॉर्मशन टेकनॉलॉजि) या कॉलेजचे संस्थापक

* महाड तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी उत्तम इंग्रजी शाळा व मुंबई विद्यापीठाच्या हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक, ४०००० से. फूट च्या भव्य इमारतीमध्ये शाळा व कॉलेजची यशस्वी वाटचाल

* नाते गावी भारताचे पहिले अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांच्या स्मारकसमितीचे अध्यक्ष व स्मारकाचे प्रणेते

* नाते येथील सद्गुरू अनंत विद्यालयाचे अध्यक्ष

* भारतातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य.

* महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशुद्ध ड्रायव्हिग प्रशिक्षण अभियान, १२०० पेक्षा जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनींचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण लायसन्ससहित पूर्ण, या ड्रायव्हिंग प्रशिक्षण अभियानचे संकल्पक व प्रणेते

* १५ वर्षांपासून महिला बचत गट व महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत ३००० पेक्षा जास्त महिलांना स्वयंरोजगार व स्वयंसिद्धता अभियानाचे प्रणेते .

* रायगड जिल्ह्यातील पहिले तालुकास्थरीय महिला बचत गटांतर्फे उत्पादित केलेल्या पहिले वस्तु विक्री केंद्र सुरु…. मा. सौ. पंकजाताई मुंडे पालवे यांच्या हस्ते शुभारंभ या उपक्रमाचे प्रणेते

* महाडचे राष्ट्रपती शिक्षक पुरस्काराने गौरविलेले साहित्यिक श्री. प्रभाकर भुस्कुटे सर यांच्या माॅं. जिजाऊ, शाहिद नामदेव पवार, पर्यावरणाच्या बाल गोष्टी अशा अनेक पुस्तकांचे प्रकाशक .

* ग्लोबल कोकण व समृद्ध कोकण या कोकणातील कृषी पर्यटन पाणी नियोजनासंदर्भात काम करणाऱ्या संस्थेचे प्रमुख सल्लागार व कार्याध्यक्ष.

*अनेक प्रथित यश उद्योगपती ,सर्व राजकीय , सामाजिक नेत्तृत्वा चे जीवस्य कंठक्ष स्नेह असणारे आणि तरीही सामाजिक जाणिवेतून सामान्यासोबत साधेपणाने सहजतेने वावरणारे रायगड भूषण ,सोशल इंजिनियर जलनायक
किशोरजी धारिया यांचे वाढदिवस अभिष्टचिंतन व प्रेमपूर्वक आलिंगन ….💐

नितीन पाटील

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *