vaibhav-virkar

महाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड

कोकण

महाराष्ट्र स्वाभिमान युवकच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची नुकतीच निवड झाली आहे. ही निवड माजी खासदार व सरचिटणीस निलेश राणे यांच्या सूचनेनुसार उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे यांनी जाहीर केली.
गेली काही वर्षे वैभव वीरकर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे चोख पार पाडत आहेत. राजकीय क्षेत्रात अनेक पदे भूषवित या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. यामुळे ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये सुपरिचित आहेत. विशेषतः महाराष्ट्र्राचे नेते माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे,माजी खा. निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राजकीय क्षेत्रात काम करीत आहेत. या दोन नेत्यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात सक्रीय झाले. या पक्षाची स्थापना झाल्यापासून वैभव वीरकर हे पक्ष वाढावा यासाठी सरचिटणीस निलेश राणे व उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे मेहनत घेत आहेत. याची दखल घेऊन आता वैभव वीरकर यांच्यावर उत्तर रत्नागिरी युवक जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या निवडीबाबत वैभव वीरकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,आपण महाराष्ट्र्राचे नेते खा. नारायण राणे,माजी खा. निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राजकीय क्षेत्रात जोमाने काम करीत आहोत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने आपल्यावर जो विश्वास दाखविला आहे,तो सार्थकी ठरवू. यामध्ये उत्तर रत्नागिरी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या युवकांची फळी उभी केली जाईल. पर्यायाने उत्तर रत्नागिरीमध्ये पक्ष वाढलेला पहावयास मिळेल, असा विश्वास व्यक्त करताना याकरिता सरचिटणीस निलेशजी राणे व उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले जाईल, असे शेवटी सांगितले

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *