529a29cba8ca758dc34ed506535d81c8

दादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या

मुंबई

दादर स्थानकाबाहेर असलेल्या फूल मार्केटमध्ये एका व्यक्तीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. दादर फुल मार्केटसारख्या वर्दळीच्या ठिकाणी अशी घटना घडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव मनोज मौर्य (३५) असे आहे. सकाळी सातच्या सुमारास ते प्रमोद महाजन उद्यानाजवळून जात असताना दोन बाईकस्वार याठिकाणी आले. त्यांनी मनोज यांच्यावर गोळी झाडली.या हल्ल्यात मनोजचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *