cb2ec66202fb19af94ce113b1312453f

रत्नागिरीत गाडीला भीषण अपघात, 2 ठार

महाराष्ट्र

कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीला संगमेश्वर तालुक्यातील दाभोळेजवळ भीषण अपघात झाला.अपघातात दोन जण जागीच ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व जण पुण्यातील रहिवासी आहेत.
पुण्यातील सहाजण मित्राच्या वाढदिवसानिमित्त देवदर्शनासाठी सकाळी बाहेर पडले. दरम्यान या मित्रांमधील एकाचा वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवसानिमित्त देवदर्शनही होईल असे सर्वांचे नियोजन होते. बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास चालकाचा ताबा सुटून गाडी रस्त्याकडेला असलेल्या झाडावर आदळली. हा अपघात एवढा भीषण होता, की दोघांचा या अपघातात मृत्यू झाला, तर ४ जण जखमी झाले. या जखमींवर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *