FB_IMG_1539163252655

शासकीय धान्य वाहतुकदारांचा प्रश्न निलेश राणे यांच्या कोर्टात

कोकण महाराष्ट्र
रत्नागिरी:  शासकिय धान्य वाहतूकदारांचा विषय आता माजी खासदार निलेश राणे यांच्या कोर्टात गेला आहे. रविवारी धान्य वाहतूकीचा  ठेका घेतलेल्या श्री.शहा यांच्याशी श्री.राणे यांनी चर्चा केली असून आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.गिरिष बापट यांच्या समवेत होणार्या बैठकित स्वाभिमान पक्षाचा विरोध असल्याचा माझा निरोप मंत्र्यांना सांगा, अशा शब्दात श्री.राणे यांनी ठेकेदाराला खडसावले. बैठकीत निर्णय न झाल्यास स्थानिक वाहतूकदारांसाठी स्वाभिमान पक्ष आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा श्री.निलेश राणे यांनी दिला आहे.
     शासकीय धान्य वहातूक यापूर्वी थेट स्थानिक ट्रक मालकांमार्फत सुरू होती. राज्य सरकारने धान्य वहातुकीचा ठेका देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शहा नामक व्यक्तीने जिल्ह्यातील सर्व धान्य वहातुकीचा ठेका घेतला आहे. प्रशासनाकडून ट्रक मालकांना देण्यात येणाऱ्या दरापेक्षा कमी दर ठेकेदार देत असल्याने ट्रक चालकांनी त्याला विरोध दर्शवीला. स्थानिक पातळीवर कोणताच निर्णय न झाल्याने अखेर ट्रक चालकांनी माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे धाव घेतली होती. रविवारी श्री.राणे यांनी ठेकेदाराला आपल्या शैलीत सुनावले. स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी मी आग्रही आहे. माझ्या मतदार संघात दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. तुमचे १५ लाख रू.देण्याची जबाबदारी माझी आहे. परंतु माझ्या ट्रक चालकांना व्यवसाय करताना तुम्ही सहकार्य करा. माझे तुम्हाला सहकार्य राहील, असे सांगितले. आजच्या बैठकीसाठी स्वाभिमानमार्फत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे शहर उपाध्यक्ष व रत्नसिंधु युनियनचे अध्यक्ष संकेत चवंडे यांना पाठविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *