20160127050751-Untitled-3

लोकलचा दरवाजा अडवणाऱ्यांना आता पोलिसांचा दणका

मुंबई

लोकलचा दरवाजा अडवणाऱ्यांना आता पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. बोरिवली ते विरार दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाने डोअर ब्लॉकिंग ड्राईव्ह चालवला आहे. त्यासाठी तीन टीम स्थापन करण्यात आल्या आहेत.
लोकलच्या डब्यात साध्या वेषातील पोलीस जवान दादागिरी करणाऱ्यांचे चित्रीकरण करतील. हे चित्रीकरण तातडीने पुढच्या स्थानकातल्या आपल्या सहकाऱ्याला हे जवान पाठवतील. त्यानंतर पुढील स्थानकावरील पोलीस लगेच दारात उभे राहून दादागिरी करणाऱ्यांना तिथेच पकडतील.
यापुढे गाडीत चढताना उतरताना कोणी धक्का मारला किंवा वाद घातला तर लगेच मुसक्या आवळल्या जातील त्यामुळे उद्दाम प्रवाशांच्या दादागिरीला चाप बसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *