IMG_20181009_143235

स्टार्टअप इंडिया नवउद्योजकांसाठी सुवर्ण संधी -किशोर धारिया

कोकण महाराष्ट्र
 एखादा व्यवसाय सुरु करण्यासाठी जर तुमच्याकडे अभिनव कल्पना असेल,तर ती कल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी स्टार्टअप इंडिया ही योजना एक सुवर्ण संधी असल्याचे हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया यांनी शुक्रवारी (दि. ५ ) सायंकाळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर बोलताना सांगितले.
             तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता,उद्योग व्यवसायातील संधी आजमाव्यात आणि स्वतःचे उद्योग निर्माण करून रोजगाराच्या संधी देखील निर्माण कराव्यात या उद्धेशाने केंद्र शासनाने स्टार्टअप इंडिया ही योजना सुरु केली आहे. या योजनेचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील युवकांपर्यंत व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री ना. सुरेश प्रभू यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून स्टार्टअप इंडिया महाराष्ट्र यात्रा सुरु केली आहे. ३ ऑक्टोबरला मुंबईतील राजभवनात या यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी येथील हिरवळ एजुकेशन ट्रस्टच्या महाविद्यालयात या यात्रेचे आगमन झाले. त्यावेळेस श्री.धारिया बोलत होते. यावेळी या यात्रेचे महाराष्ट्र प्रमुख श्री. करण,हिरवळ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री ठाकूर,महाड प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण कुलकर्णी,कार्याध्यक्ष रवि शिंदे आदी उपस्थित होते.स्टार्टअपच्या माध्यमातून आंध्रप्रदेशातील एका पदवीधर तरुणाने ड्रोनच्या  साहाय्याने पिकांवर कीटकनाशके फवारण्याचा उद्योग उभा केला असल्याची माहितीहि श्री. करण यांनी दिली.
            या कार्यक्रमाला हिरवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या  विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती. यापैकी किमान ५ ते ६ विध्यार्थी ठाणे येथे ८ ऑक्टोबरला होणाऱ्या बुट कॅम्पला उपस्थित राहणार आहेत.
 IMG_20181009_143232
Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *