sonam-jamsutkar

पालिकेच्या शाळा,मैदाने,रुग्णालयात ‘संविधान उद्धेशिका’ शिलालेख बसवा – नगरसेविका सोनम जामसुतकर

मुंबई

मुंबई महापालिकेच्या शाळा, मैदाने, उद्याने,रुग्णालये आणि प्रशासकीय इमारती यामध्ये भारतीय संविधानाच्या उद्धेशिकेचा शिलालेख बसविण्यात यावा,जेणेकरून मंबईकर नागरिकांमध्ये राष्ट्रहिताची आणि एकतेची भावना जागृत राहील, तसेच भारत एक सार्वभौम लोकशाही गणराज्य असल्याची प्रेरणा भावी पिढीस मिळेल,अशा मागणीची ठराव सूचना प्रभाग क्रमांक २१० च्या काँग्रेस नगरसेविका सौ. सोनम मनोज जामसुतकर यांनी केली आहे.
नगरसेविका सौ.सोनम जामसुतकर यांनी १५ सप्टेंबर २०१८ रोजी पालिका सभागृहात सादर केलेल्या ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे की,भारताच्या घटनेने भारतीयांना ‘मूलभूत हक्क’ हे लोकशाही जीवन पद्धतीचा आत्मा असून मानवी जीवनाचे ते एक प्रमुख मूल्य आहे. भारताचा राष्ट्रग्रंथ म्हणून जगात सुप्रसिद्ध असलेले ‘भारतीय संविधान’ हे भारताचा अभिमान आहे. न्याय,स्वातंत्र्य,समता,एकता,आणि बंधुभाव यांचे प्रतीक असलेले आणि भारतीयांनी भारतीयांनाच अर्पण केलेली भारतीय संविधानाची उद्धेशिका’ शिलालेखाच्या माध्यमातून जनतेच्या नेहमी वाचनात आणि मनात कायम राहणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *