IMG-20181008-WA0052.jpg

भोके ग्रामस्थांनी केला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश

कोकण महाराष्ट्र

भोके ग्रामस्थांनी केला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश

डांबर घोटाळा उघडकीस आणणार : निलेश राणे

रत्नागिरी : आर डी सामंत कॉन्स्ट्रक्शन कंपनीने 1999 पासून केलेला डांबर घोटाळा लवकरच मी बाहेर काढणार आहे. याच घोटाळ्यामुळे रत्नागिरीतल्या सगळ्याच आणि तुमच्या गावातील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. मात्र आता या घोटाळ्यावरचा जसा पडदा उठणार आहे. या गावाला चांगला रस्ता तयार करून देण्याची जबाबदारी आता मी घेतली आहे. चांगला रस्ता आणि पुलाचे काम करून देईन, असे आश्वासन देतानाच गेली पंधरा वर्ष रत्नागिरी जिल्हा शिवसेनेच्या ताब्यात तुम्ही दिलात, काय मिळालं, बेरोजगारी गेली का? दरडोई उत्पन्न वाढले का? तुम्ही फक्त मते द्यायची, त्याचा फायदा पुढार्यांनी घ्यायचा हे चित्र बदलायला हवे यासाठी तुम्हीच पुढाकार घ्या. रत्नागिरीची परिस्थिती मी आवाक्या बाहेर जावू देणार नाही. जेथे पाहिजे तेथे गुंडगीरी करणारच ही राणेंची भाषा आहे. आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करु नका असा इशारा विरोधकांना देत भोके गावातील एकाहि ग्रमस्थाच्या केसाला धक्का लागला तर येणारा परत जाणार नाही, असा इशारा स्वाभिमानचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी दिला.

रविवारी रात्री भोके रेवाळेवाडी येथे पंचक्रोशीतील ग्रमस्थांनी स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. त्यावेळी आयोजित मेळाव्यात श्री.राणे बोलत होते. या मेळाव्याला ज्येष्ठ नेते विलास पेडणेकर, जिल्हाध्यक्ष रविंद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष सचिन आचरेकर, अमित देसाई, मेहताप साखरकर, उपतालुकाध्यक्ष योगेंद्र सावंत, विभाग अध्यक्ष विनायक साळुंखे, पिंट्या निवळकर, लक्ष्मण रेवळे, बाळकृष्ण मायंगडे, लक्ष्मण रेवाळे, दीपक पवार, राजन आंबेकर, प्रकाश मायंगडे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी भोके रेवाळेवाडीतील चारशेहून अधिक ग्रमस्थांनी स्वाभिमानमध्ये प्रवेश केला. अमित देसाई विनायक साळुंखे, रुपेश रेवाळे आदींनी यासाठी परिश्रम घेतले होते. त्यांचाहि सत्कार करण्यात आला.

रत्नागिरी जिल्ह्यात असे काय घडले की, विकास न होताहि येथील जनता शिवसेना पाठिशी उभी राहिली. केवळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करुन शिवसेनेवाले मते घेऊन सत्ते बसले आहेत. परंतु येथील भागाचा विकास पुर्णपणे खुंटला आहे. स्थानिक आमदारांना विकासाचे देणेघेणे नाही. शेतकर्यांची अधोगती झाली आहे. तरुण आजहि बेरोजगार आहेत असे असतानाहि आपण त्यांच्या पाठीशी उभे का राहतो हा प्रश्न अनुत्तरीत आहे. परंतु भोके रेवाळेवाडी ग्रमस्थांनी घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. त्यांनी दाखविलेले धाडस कौतुकास्पद असल्याचे श्री.राणे यांनी सांगितले.

स्थानिक लोकप्रितनिधींची अनेक प्रकरणे मी बाहेर काढणार आहे. मी कोणालाहि सोडणार नाही. आमदार उदय सामंत पैसे देवून म्हाडाचे अध्यक्ष झाले आहे. मातोश्रीवर केवळ पैसा चालतो हे सिध्द झाले आहे. खा.विनायक राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत आ.सामंत यांच्याकडून खर्च करुन घ्यायचा असल्याने म्हाडा अध्यक्षपदासाठी शिफारस केल्याचा आरोप श्री.राणे यांनी केला.

खासदार विनायक राऊत हे मतदार संघात दिसतात कुठे. त्यांनी जिल्ह्याचा काय विकास केला. स्वतःच्या तळगाव येथे घराशेजारी असलेल्या कुटुंबावर नैसर्गिक आपत्ती ओढवल्यानंतर त्यांना मदत करण्याची जाणीव या खासदारांकडे नाही. ते इतर गावांचा विकास काय करणारप, असा प्रश्न श्री.राणे यांनी उपस्थित केला. माझी झुंज विकासासाठी आहे. विकासासाठी ज्या भाषेत बोलायला लागेल त्या भाषेत बोलण्याची माझी तयारी आहे. असेही ते सांगायला विसरले नाहीत. या कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते, यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने ग्रामीण भागात रुजण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत होते.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *