Startup-India

Start Up यात्रा कोकणात होणार दाखल…

कोकण महाराष्ट्र
Start Up यात्रा कोकणात होणार दाखल… (Start Up योजने विषयी खालील माहिती आवश्य वाचा व नवउद्योग सुरु करणाऱ्या तरुणांना कळवा)
आपला मुलगा, भाऊ, बहीण, मित्र यांच्या मनात नवीन उद्योग सुरु करण्याकरिता खूप सुंदर कल्पना असतील पण हा उद्योग कसा सुरु करायचा आणि हा उद्योग सुरु करण्यापासून वाढवण्यापर्यंत कोण मदत करेल असा प्रश्न आपल्या पुढे असेल तर त्याच उत्तर या नवकल्पना असणाऱ्या उद्योजकाला Start Up India योजनेची माहिती असणे आवश्यक आहे. आपल्याकडील ग्रामीण भागातील आविष्काराच्या संकल्पना असणाऱ्या युवकांना जर संधी हवी असेल तर श्री. सुरेशजी प्रभू यांच्या मार्गदर्शनाने व संकल्पनेतुन सुरु झालेल्या Start Up India यात्रेत त्याचा सहभाग महत्वाचा असेल.
महाराष्ट्रातील नवीन कल्पना आधारित उद्योग सुरु करू इच्छिणारे नवउद्योजक तसेच कॉलेज मधील स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता व Start Up योजनेअंतर्गत सुरु केलेल्या उद्योगांना आपल्या कल्पना शासनापर्यंत पोहचवण्यासाठी व नवीन उद्योग उभे करण्याकरिता सर्वोत्तपरी सहकार्य मिळण्याकरिता Start Up India या योजनेची शासनातर्फे सुरुवात झालेली आहे.
आपल्या कोकणातील अनेक तरुण नवउद्योजक यांना उद्योग उभारणीसाठी शासनाच्या Start Up योजनेतर्फे निश्चित कशाप्रकारे मदत व मार्गदर्शन मिळणार आहे, याची माहिती कोकणातील छोट्या-छोट्या गावांमध्ये उद्योगांच्या उत्तम व अभिनव कल्पना असणाऱ्या उद्योजकांना मिळावी, ह्या हेतुने मा. श्री. सुरेशजी प्रभू यांनी Start Up ची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.
शुभारंभाच्या कार्यक्रमात मा. श्री. विनोदजी तावडे यांनी विद्यापीठांना Incubation सेंटर अर्थात Start Up संदर्भात माहिती व मार्गदर्शन करणारे केंद्र म्हणुन नेमणुक केली आहे. या विद्यापीठांतुन अभ्यासक्रमांबरोबरच उद्योग निर्मिती संकल्पनांनाही मार्गदर्शन मिळेल असे प्रतिपादन केले. मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील  नवीन संकल्पना घेऊन उद्योग सुरु करणाऱ्या युवकांसाठी अर्थात महाराष्ट्रातील नवउद्योजकांसाठी Start Up यात्रा हि सुवर्णसंधी असुन महाराष्ट्रात नवउद्योग उभारणीची मुहूर्तमेढ आहे. जास्तीत जास्त तरुणांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. मा. श्री. सुरेशजी प्रभू यांनी नवीन येणाऱ्या अर्थनीतीमध्ये जुने पारंपरिक उद्योग कमी होऊन नव्या कल्पना व आविष्कारातून निर्माण झालेले उद्योग हे फार मोठी आर्थिक कामगिरी करत असल्याचे सांगितले.
महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. विद्यासागर राव यांनी हि  Start  Up यात्रा नवउद्योजकांसाठी परिवर्तन यात्रा ठरेल, अशा शुभेच्छा दिल्या व Start Up रथाला हिरवा झेंडा दाखवुन शुभारंभ केला.
प्रत्येक गावातील कल्पक तरुणाला स्वतःच्या पायावर उद्योग निर्माण करण्यासाठी त्याच्या कल्पनेतून सुरु होणाऱ्या उद्योगासाठी पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग व मार्केटिंग पर्यंत नवउद्योगांस मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या उद्योग व्याप्ती करिता अर्थसहाय्य उभं करून देणे, हि या Start Up यात्रेमागची भावना असून माझ्या महाराष्ट्रातील तरुणांकडे आता आविष्कारिक व अभिनव संकल्पना असतील तर Start Up योजनेअंतर्गत त्याचे पालकत्व स्वीकारले जाईल असे श्री. सुरेशजी प्रभू यांनी प्रतिपादन केले.
कसे होता येईल आपल्याला Start Up यात्रेत सहभागी…
नवसंकल्पना असणाऱ्या तरुणांनी तसेच स्वतः काहीतरी उद्योग सुरु करता येईल का अशी महत्वाकांक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच नवउद्योजकांना तांत्रिक मार्गदर्शन व आर्थिक सहकार्य करू इच्छिणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांनी www.startupindia.gov.in या वेबसाइट वर ऍप्लिकेशन फॉर्म भरून पाठवायचा आहे. या फॉर्ममध्ये Start Up माहिती घेऊ इच्छीणाऱ्या युवकाची स्वतःची माहिती व त्याला अभिप्रेत असणाऱ्या नवउद्योगाच्या  संदर्भात थोडक्यात माहिती द्यावयाची आहे. अप्लिकेशन फॉर्म अत्यंत साधा व सुटसुटीत आहे तसेच ऑनलाईन फॉर्म भरला नाही तरी बुटकॅम्पच्या (कार्यशाळेच्या) ठिकाणी प्रत्येक्ष जाऊन नोंदणी करता येईल.
काय असेल बुट कॅम्प (कार्यशाळा)
बुट कॅम्प अर्थात एक दिवसाची संपुर्ण Start Up विषयी माहिती देणारी कार्यशाळा पुढे दिलेल्या वेळापत्रकानुसार तालुक्यांच्या ठिकाणी होणार आहे. या प्रत्येक कार्यशाळेतील सर्वोत्कृष्ठ कल्पनांना पुढे नागपूर येथे होणाऱ्या अंतिम कार्यशाळेत मानांकित करण्यात येणार आहे.
ज्यांच्याकडे नवउद्योगांच्या कल्पना किंवा भावी आयुष्यात स्वतः व्यवसाय व उद्योग करण्याची इच्छा आहे. अशा प्रत्येक कोकणातील तरुणांनी या कार्यशाळेत भाग घेतला पाहिजे. कोकणात असणाऱ्या पर्यटन, कृषी, मत्स्य उद्योगांतील नव्या कल्पना किंवा नवे उद्योग सुरु करण्यासाठी मा. श्री. सुरेशजी प्रभु यांची Start Up यात्रेची कार्यशाळेमुळे तरुणांना उद्योग उभारणीची नवी दिशा मिळणार आहे.
काय असेल Start Up रथ…
मा. श्री. सुरेशजी प्रभू यांच्या मार्गदर्शनाने व संकल्पनेने Start Up रथ या संकल्पनेत नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये उद्योग उभारणीची प्रेरणा निर्माण व्हावी याकरिता Start Up योजनेची संपूर्ण माहिती असणारा रथ अर्थात Van खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार तालुक्यांच्या गावांमध्ये येणार आहे.
जास्तीत जास्त कॉलेज मधील विद्यार्थी सहभागी झाल्यास अनेक नवउद्योजक उभे राहू शकतील. या संपूर्ण यात्रेचे तपशील www.startupindia.gov.in या वेबसाईट तसेच १८००११५५६६ या टोलफ्री नंबर वर संपूर्ण माहिती मिळेल.
मा. श्री. सुरेशजी प्रभू सावंतवाडी येथील कार्यशाळेत स्वतः उपस्थतीत राहून मार्गदर्शन करणार आहेत.
मा. श्री. सुरेशजी प्रभू  यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या यात्रेची माहिती जास्तीत जास्त आपल्या जिवलग कोकणवासियांपर्यंत पोहचवा. जास्तीत जास्त ग्रुप्स वर शेअर करा. आपल्या कोकणातील तरुण नवउद्योजक योजनेच्या माहितीच्या अभावामुळे मागे राहणार नाहीत याची काळजी घेऊया. या Start Up यात्रेतून नवीन तरुणांना उद्योग सुरु करण्याकरिता आत्मविश्वास मिळेल, याकरिता मा. श्री. सुरेशजी प्रभू यांचे मनस्वी धन्यवाद!
किशोर धारिया – संजय यादवराव
समृद्ध कोकण
ReplyForward
Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *