nilesh-rane-300x279

तनुश्री – नाना वादावर बोलायला केसरकारांकडे वेळ आहे,सिंधुदुर्गातील पीडित मुलीला भेटायला वेळ नाही – निलेश राणे

कोकण महाराष्ट्र

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना सिंधुदुर्गातल्या बलात्कार पीडित मुलीला भेटायला वेळ नाही, आमदार वैभव नाईक यांच्या हॉटेलवर जिथे या मुलीवर बलात्कार त्यावर कार्यवाही नाही. पण नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता वादावर बोलायला केसरकारांकडे वेळ आहे.अशी घणाघाती टीका माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवरून केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात मालगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार करण्यात आला होता. जिथे बलात्कार झाला ते हॉटेल शिवशेना आमदार वैभव नाईक यांच्या निकटवर्तीयांचे आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी नुकताच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर महिलांचा विराट मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे गृह राज्यमंत्री असलेल्या दीपक केसरकर यांनी मौन बाळगले आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *