business

देशातील आठ प्रमुख उद्योगांचा ऑगस्ट 2018 मधील निर्देशांक

देश व्यापार

देशातल्या आठ प्रमुख उद्योग क्षेत्रांच्या प्रगतीचा निर्देशांक खालीप्रमाणे:-

  • ऑगस्ट महिन्यात या सर्व उद्योगांचा एकत्रित निर्देशांक 128.1 इतका होता. तर एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यातील निर्देशांक 5.5 टक्के इतका आहे.
  • कोळसा- ऑगस्ट महिन्यात कोळशाचे उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत 2.4 टक्क्यांनी वाढले.
  • कच्चे तेल- ऑगस्ट महिन्यात कच्च्या तेलाचे उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत 3.7 टक्क्यांनी घटले.
  •  नैसर्गिक वायू- ऑगस्ट महिन्यात नैसर्गिक वायूचे उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत 1.1 टक्क्यांनी वाढले.
  • तेल शुद्धीकरण उत्पादने- पेट्रोलियम तेल शुद्धीकरण उत्पादन ऑगस्ट महिन्यात 5.1 टक्क्यांनी वाढले.
  • खते- ऑगस्ट महिन्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत खतांचे उत्पादन 5.3 टक्क्यांनी घटले आहे.
  • पोलाद उत्पादन- ऑगस्ट महिन्यात पोलाद उत्पादन गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत 3.9 टक्क्यांनी वाढले.
  • सिमेंट- ऑगस्ट महिन्यात सिमेंटच्या उत्पादनात गेल्यावर्षीच्या तुलनेत 14.3 टक्क्यांची वाढ झाली.
  • वीज- ऑगस्ट महिन्यात वीजेच्या उत्पादनात गेल्यावर्षीच्या तुलनेत 5.4 टक्क्यांची वाढ झाली.
Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *