Jharsuguda airport

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारसुगुडा विमानतळाचे उदघाटन

देश व्यापार

ओडिसा – पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी काल झारसुगुडा येथे एका नवीन विमानतळाचे उदघाटन केले. ते ओडिसाचे पॉवरहाऊस म्हणूनही ओळखले जाते. ओडिसाचे राज्यपाल प्रा. गणेश लाल, राज्याचे मुख्यमंत्री श्री.नवीन पटनायक, केंद्रीय वाणिज्य व उद्योग आणि नागरी उड्डयन मंत्री श्री. सुरेश प्रभू, केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि कौशल्य विकास मंत्री श्री.धर्मेंद्र प्रधान तसेच आदिवासी व्यवहार मंत्री श्री. ज्युलऑराम यावेळी उपस्थित होते.

भुवनेश्वर नंतर झारसुगुडा हे ओडिसा राज्यातील दुसरे विमानतळ आहे. झारसुगुडा हे भुवनेश्वर, रायपूर आणि रांची या शहरांना हवाई वाहतुकीने जोडले जाणार आहे. कोरापुट जिल्ह्यातील जेपोर, सुंदरगड जिल्ह्यातील राउरकेला आणि कालाहांडी जिल्ह्यातील उत्केला हि आणखीन तीन विमानतळे किनारपट्टीच्या किनाऱ्यावरील दूरच्या प्रदेशांना कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी विकसित केले जाणार आहेत.
ओडिसा राज्यात या चार विमानतळाचे पुनरुत्थान आणि उन्नतीसाठी रू.३७० कोटी इतकी रक्कम प्रादेशिक कनेक्टिविटी योजनेअंतर्गतदेण्यात आली आहे.

झारसुगुडा येथील नवीन विमानतळ पश्चिम ओडिसाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि या क्षेत्रातील वाढत्या पर्यटन उद्योगांना प्रोत्साहन देईल.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *