kishor dharia1

कोकणचा कॅलिफोर्निया नको तर इक्वाडोर मध्ये कोकण-इंडिया करूया.- किशोर धारिया

कोकण देश महाराष्ट्र व्यापार

इक्वाडोर लॅटिन अमेरिकेतील एक छोटासा देश, येथील नैसर्गिक साधनसंपत्ती व वातावरण भारताशी साधर्म्य असलेला देश, क्षेत्रफळाच्या आणि भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत छोटा परंतु समाधानी देश तसेच भारतीय नागरिकांना खुला प्रवेश असणारा अर्थात विझा न लागणारा देश.
मुंबई मध्ये इक्वाडोर चे कॉऊंसिलेट जनरल श्री.हेक्टोर यांनी नुकताच इक्वाडोरचे अँबॅसिडोर म्हणुन पदभार स्वीकारला. या निमित्ताने दिल्लीत त्यांची भेट घेतली असता भारतीय संस्कृती कला तसेच नैसर्गिक आयुर्वेद या संदर्भात अत्यंत दिलखुलास चर्चा केली. जगातील उत्तम आणि उदात्त सगळ्या गोष्टी केवळ भारतातच असल्याचे हेक्टोर यांचे विचार खरोखरच अभिमानास्पद होते.

kishor dharia 2
कोकणाची कॅलिफोर्नियाशी तुलना करण्याची गरजच नाही. कोकणासारखा प्रेमाने वागवणाऱ्या नागरिकांचा प्रांत, समृद्ध निसर्ग व समुद्र किनारा असणारा प्रांत हा भारताचा मानबिंदु आहे. श्री. हेक्टोर वेंगुर्ला दौऱ्यावर असताना त्यांनी मच्छिमार बांधवांच्या घरी खाली बसून जेवण घेतले. कोकणातील मच्छीमार बांधवांच्या घरातील स्वच्छता व छोट्याश्या घरात सर्व सोयींनी युक्त नीटनेटकेपणा याचे वर्णन हेक्टोर करून कोकणाचा समुद्रकिनारा व मत्स्य व्यवसाय याची पर्यटनाशी जोड देता येईल आणि भारताच्या सहकार्यातून इक्वाडोर मध्ये भारताची संस्कृती व परंपरा मला निर्माण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे गौरव उद्गार काढले.
शिक्षणतज्ञ डॉ. स्नेहल दोंदे, श्री. सुधीर राठोड व माझ्या बरोबर झालेल्या अनेक विषयांवरील चर्चेनंतर ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ याचे खरं दर्शन झालं.
समृद्ध कोकण अभियानातून इक्वाडोर या देशातून अमेरिकेत निर्यात व्यापार सोयीस्कर व सोपा असल्याने कोकणातील व्यापाऱ्यांच्या समवेत इक्वाडोर येथे अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्याच बरोबर इक्वाडोरचे पथक देखील कोकण दौऱ्यावर येणार आहे. लवकरच या संदर्भातील प्राथमिक करारनामा देखील करण्यात येणार आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *