CII

मा. सुरेशजी प्रभू यांच्या मार्गदर्शनाने व सीआयआय तर्फे कोकणामध्ये सुरु होणार कौशल्य प्रशिक्षण केंद्र व मॉडेल करिअर सेंटर

कोकण महाराष्ट्र शिक्षण

मा. ना. श्री. सुरेशजी प्रभू यांचे कोकणाच्या कृषी पर्यटन व कौशल्य प्रशिक्षण क्षेत्रात युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी अजून एक ठोस पाऊल

कोकणातील कृषी पर्यटन कौशल्य प्रशिक्षण क्षेत्रात भारतातील नामांकित CII (Confederation of Indian Industry) या सर्व उद्योग समूहांची शिखर संघटनेच्या सहकार्याने कोकणात कौशल्य प्रशिक्षण व रोजगार मार्गदर्शन केंद्र स्थापन होणार आहे. मा. श्री. सुरेशजी प्रभू यांच्या मार्गदर्शनाने नुकतेच दिल्ली येथे CII संस्थेच्या कार्यालयात प्राथमिक नियोजनासंदर्भात बैठक संपन्न झाली. CII कार्यालयात झालेल्या या बैठकीत हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. किशोर धारिया, शिक्षण तज्ञ सौ. स्नेहल दोंदे, श्री. सुधीरजी राठोड (अर्थ व वनमंत्री यांचे स्वियसहाय्यक) व श्री. सी. एम. शर्मा (श्री. सुरेशजी प्रभू यांचे स्वियसहाय्यक) हे देखील उपस्थित होते. मा. श्री. सुरेशजी प्रभू यांना अभिप्रेत असणारे कृषी क्षेत्रात तसेच पर्यटन क्षेत्रातील होमस्टे व ग्रामपर्यटनाला CII तर्फे प्रशिक्षण तसेच सर्वोतपरी सहकार्य करण्यात येणार आहे, याची निश्चिती झाली.

skill tarining center

उद्योगामध्ये आवश्यक असणाऱ्या क्षेत्रामध्ये उद्योजकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी CII तर्फे कायमस्वरूपी कौशल्य प्रशिक्षण केंद्र तसेच बेरोजगार युवकांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधींची माहिती देण्यासाठी व रोजगारासाठी कायमस्वरूपी मॉडेल करियर सेंटर सुरु होणार आहे. कोकणातील सर्व कॉलेजस मध्ये विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स यात्रेचे देखील नियोजन केले जाणार आहे.

kishor dharia and cii team

 

 

 

 

 

 

 

प्रत्यक्षात उद्योग समूहांच्या शिखर संघटनेने कोकणातील कायमस्वरूपी केंद्रासाठी मान्यता दिल्याने मा. श्री. सुरेशजी प्रभू यांच्या माध्यमातुन कोकणातील युवकांना स्वयंरोजगाराच्या व रोजगाराच्या संधी व त्याकरिता कायमस्वरूपी केंद्र सुरु होणार असल्याने कोकणातील तरुणांमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. या संदर्भात लवकरच केंद्राचे ठिकाण व पुढील कार्यवाहीची दिशा ठरवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात CII व वरिष्ठांच्या बैठकीचे नियोजन केले आहे. अशी माहिती श्री. किशोर धारिया व श्री. संजय यादवराव यांनी दिली.

cii programs

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *