swine_flu-_01_1756347_835x547-m

पिंपरी-चिंचवडमध्ये “स्वाईन फ्लू’चा वाढता प्रादुर्भाव

महाराष्ट्र

“स्वाईन फ्लू’चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या चार दिवसात सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सद्यस्थितीला 110 रुग्ण बाधित असून 28 जणांना कृत्रिम श्‍वासोच्छवासावर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आलेले आहेत.
“स्वाईन फ्लू’ने जानेवारी महिन्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर “स्वाईन फ्लू’ने काढता पाय घेतला. मात्र, जुलै महिन्यात अचानक या आजाराने डोके वर काढल्याने गेल्या चार महिन्यात 19 रुग्णांचा मृत्यू झाला. या भयावह आकडेवारीने नागरिकांमध्ये घबराट पसरलेली आहे. तसेच, सद्यस्थितीला 110 रुग्ण बाधित असून 28 जणांना कृत्रिम श्‍वासोच्छवासावर ठेवण्यात आलेले आहेत.
शहरात 8 बाधित रुग्ण आढळलेले आहेत. गेल्या चार दिवसात “स्वाईन फ्लू’ने सहा जणांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
“स्वाईन फ्लू’ला रोखण्यासाठी महापालिकेने गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र, “टॅमी फ्लू’च्या लसीचा तुटवडा महापालिका रुग्णालयात जाणवत आहे. हा आजार आटोक्‍यात आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत असल्याने “स्वाईन फ्लू’ नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. तसेच, खासगी रुग्णालय व महापालिका या दोघांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *