petrol-bizz-May-21

पेट्रोल डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ

देश मुंबई

आज पेट्रोलच्या दरात १४ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत आज एक लिटर पेट्रोलसाठी ८८.२६ रुपये मोजावे लागत आहेत. डिझेलच्या दरांमध्येही १५ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे डिझेलचा दर ७७.४७ रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल परभणीत मिळत असून आज तेथील दर पेट्रोलचा दर ९०.५ व डिझेल ७८ रुपये प्रति लिटर आहे.
बंदच्या दिवशीही लिटरमागे पेट्रोल २३ पैशांनी तर डिझेल २२ पैशांनी महागले.
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या मुल्याने नीचांकी पातळी गाठण्याचे सत्रही कायम असल्याने कच्च्या इंधनाच्या आयातीसाठी जादा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे इंधन दरवाढ होत आहे. दरम्यान, इंधन दरांच्या भडक्‍यापासून जनसामान्यांना दिलासा देण्यासाठी कर कमी करण्याची मागणी विरोधक करत आहेत. मात्र, करामध्ये कपात करण्याचा केंद्र सरकारचा कुठलाही विचार नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *