suresh prabhu meeting

अखंड ऊर्जेचे स्तोत्र – ना.सुरेशजी प्रभु !

अग्रलेख महाराष्ट्र

ऊर्जेच्या सानिध्यातिल,मा.सुरेशजी प्रभु यांच्या दालनातिल ६० मिनिटे ,

या एक तासात किमान १० शिष्टमंडळांना भेटी , नर्सरीतल्या छोट्या मुलांची काळजी , त्यांच्या शाळेला शुभेच्छा , विदेशी शिष्टमंडळाबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्द्ल चर्चा , लगेचच निर्णय याच दरम्यान दोन खासदार , एक केंद्रीय मंत्री आणि एका राज्याचे उत्तराखंडचे मुख्यमंत्री यांच्या बैठका पुन्हा जवळपास त्याचवेळी सर्व निर्णय , मागील विषयांचा पाठपुरावा , सर्वांचे संपूर्ण समाधान दरम्यान शेतकरी नेते पाशा पटेल यांच्या बरोबर देशातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अधिक सुविधा कशा देता येतील , शेती मालाच्या एक्सपोर्ट वर इन्सेन्टिव्ह देऊन निर्यात कशी वाढवता येईल , बांबू शेतीचा विस्तार , आधुनिक शेती साठी ड्रोनचा वापर या प्रत्येक विषयाचा थेट निर्णय , पाशा पटेल यांनी सांगितले गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांचा हजारो कोटींचा फायदा केवळ प्रभु साहेबांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार इम्पोर्ट – एक्स्पोर्ट संबधी काही धडाकेबाज निर्णयांमुळे झाला .
दरम्यान सिंधुदुर्ग /रत्नागिरी मधून काही शेतकरी , जिल्हा बँकेचे संचालक यांची भेट प्रत्येकाची आस्थेने चौकशी अगदी आई वडील , मुलांची सुद्धा सर्वांची घरच्यांची नावे घेऊन विचारपूस . इतक्या व्यस्त व्यक्तिमत्वाला काही काम नसताना जिल्ह्यातील माणसे भेटत होती .व त्याना मनापासून प्रभू साहेब भेटत होते .

suresh prabhu with small kids

रत्नागिरी राऊंड टेबल बैठकीत झालेली चर्चा , निर्णय प्रत्येक निर्णयाचा पाठपुरावा कुडाळ येथे लेदर इन्स्टिट्यूट , प्रक्रिया उद्योगात शेतकऱ्यांना आधुनिक पॅकेजेस मिळावेत म्हणून राष्ट्रीय पॅकेजिंग इन्स्टिट्यूटचा कोकणातील सहभाग , हापूस जीआय मानांकन , कोकणातील उत्पादनांचे एक्सपोर्ट , परदेशातील एक्स्पोर्ट इंपोर्टर बैठका , अत्याधुनिक पर्यटन विकासासाठी कोकणात राष्ट्रीय पर्यटन प्रशिक्षण संस्था , कोकणात आंबोली , मालवण , वेंगुर्ला आणि रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन सर्किट विकास , वेलनेस टुरिझम , बीच टुरिझम , फिशरमेन व्हिलेज , एअर स्पोर्ट्स टुरिझम अनेक संकल्पना राबविणे , MPEDA, APEDA या राष्ट्रीय संस्थांच्या योजना राबविणे , CII च्या माध्यमातून जलसंवर्धन व कौशल्य प्रशिक्षण एक नाही अशा अनेक योजनांचे नियोजन प्रभु साहेबांनी कोकणासाठी केले आहे . भविष्यातील प्रगत कोकणची पायाभरणी प्रभु साहेब करत आहेत . या प्रत्येक निर्णयाचा त्या त्या अधिकाऱ्याबरोबर पाठपुरावा !

suresh prabhu in meeting

इतकी ऊर्जा , इतका कामाचा उरक , इतक्या वेगवेगळ्या विषयावर एका वेळी निर्णय घेणे त्याच वेळी आपल्या माणसांची आपल्या प्रदेशाची काळजी ही ६० मिनिटे आमच्या साठी प्रचंड प्रेरणादायी होती , ऊर्जा देणारी होती .

सावर्ड्यातील कृषी पर्यटन परिषदेनंतर कोकणातील कृषी पर्यटन होम स्टे या विषयात चर्चा करण्यासाठी त्यातूनच आम्हाला साहेबांनी १० मिनिटे दिली व या विषयातही अनेक सकारात्मक योजना पुढच्या काळात तयार होतील .
मा. सुरेशजी प्रभु साहेब खूप खूप धन्यवाद .

संजय यादवराव / किशोर धारिया .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *