bharat band

भायखळा विधानसभा मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व मित्र पक्षांनी दिली “भारत बंद” ची हाक

महाराष्ट्र मुंबई

केंद्र शासनाने डिझेल,पेट्रोल,घरगुती गॅस व जिवनावश्यक वस्तुंवर अवास्तव केलेल्या दरवाढीच्या विरोधात आज भायखळा विधानसभा मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व मित्र पक्षांनी “भारत बंद” ची हाक दिली.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य व मुंबई काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मा.आमदार मधु अण्णा चव्हाण यांच्या हस्ते प्रथम सकाळी १०. ३० वा. पॅलेस सिनेमाजवळ,डॉ.बी.ए.रोड,भायखळा(पू), येथे देशाचा तिरंगा ध्वज फडकवून आंदोलनास सुरवात केली. संपूर्ण भायखळा विधानसभा मतदार संघातील अनेक व्यावसायिक दुकानदार, फेरीवाले विशेषत: विभागातील जनतेने या भारतबंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. केंद्र व राज्यातील सत्तधा-यांनी पोलीस प्रशासनामार्फत सदर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु केंद्र शासनाने वाढवलेल्या या महागाईच्या भस्मासूराचा वध करण्याकरिता भायखळा विधानसभा मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व मित्र पक्षांतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन शांतता व शिस्तीच्या मार्गाने हा भारत बंद भायखळ्यात पूर्णपणे यशस्वी केला. त्याबद्दल मा.आमदार श्री. मधु अण्णा चव्हाण यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचे सोशल मिडीयाच्या माध्यमातून आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *