Fuel-Petrol-Diesel_ANI

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

महाराष्ट्र मुंबई

पेट्रोल-डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील मुंबईसह इतर प्रमुख शहरातदेखील पेट्रोल दरवाढ सुरूच आहे. मुबंईतील पेट्रोल दराचा हा उच्चांक असून महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत मिळत आहे. पेट्रोलच्या किंमतीत वेगाने वाढ होत असून पेट्रोल शंभरीपासून अवघे 12 रूपये दूर आहे. मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत आज 48 पैशांनी वाढ झाली आहे. आज मुंबईत पेट्रोल 87.39 रूपयांवर पोहोचल आहे, तर डिझेल 76.51 रूपये झालं आहे.
मुंबईसह इतर शहरात देखील इंधनदरवाढ होत आहे. पुणे येथे आजचा पेट्रोल दर 87.25 रूपये तर डिझेलचा दर 75.20 रूपयांवर पोहचला आहे. पुणे लगतच्या पिंपरी-चिंचवड शहरात आज पेट्रोलचा दर 87.31 रूपये तर डिझेलचा दर 75.21 रूपये असा आहे.
डॉलरच्या किंमती वाढून रूपयाच्या किंमती रोज घसरत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातून कच्चा तेलाची आयात करणे दिवसेंदिवस महाग ठरत आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा स्थितीत केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात करून नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी जनतेकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *