bsnl-750x430

बीएसएनएलचा नवा प्रीपेड प्लॅन; मिळणार अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा

व्यापार

भारतीय संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनला टक्कर देण्यासाठी नुकताच आपला एक नवा प्रीपेड प्लॅन जाहीर केला आहे. ७५ रुपयांचा हा प्लॅन असून त्याची वैधता १५ दिवसांची आहे.
ग्राहकांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग फ्री असणार आहे. त्याचबरोबर ५०० मोफत मेसेज तसेच १० जीबी डेटा मिळणार आहे. फक्त मुंबई आणि दिल्लीतील बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी हा प्लॅन सध्या असणार आहे. लवकरच हा प्लॅन सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.
या प्लॅनची मुदत बीएसएनल ग्राहक अतिरिक्त पैसे भरून वाढवू शकता. ही मुदत ९० किंवा १८० दिवसांपर्यंत होऊ शकते. मुदत वाढवण्यासाठी ९८ रूपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. ९८ रूपयांच्या रिचार्जनंतर तुमची मुदत ९० दिवसांपर्यंत होऊ शकतो. प्रीपेट ग्राहकांना प्रथम ९८ रूपयांचा रिचार्ज करावा लागेल. त्यानंतर तुम्ही ७५ रूपयांच्या प्लॅनसाठी पात्र ठरू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *