xiaomi_redmi_6_pro_red_1529877511712

शाओमी रेडमी ६ स्मार्टफोन आज होणार भारतात लाँच

व्यापार

शाओमीने रेडमी ६ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याला दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. आता बाजारपेठेत रेडमी ६, रेडमी ६ प्रो आणि रेडमी ६ ए हे स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. यातील रेडमी ६ या मॉडेलला दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले आहे.
शाओमी रेडमी ६ हा प्रचलीत डिझाईनवर आधारित स्मार्टफोन आहे. याच्या वर-खाली आणि बाजूला कडा देण्यात आल्या आहेत. तर मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर दिले आहे. अलीकडे प्रचलीत झालेले नॉचयुक्त डिझाईन यात दिलेले नाही. यात ५.४५ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस (१४४० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा आणि १९:९ असा अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले दिलेला आहे. यामध्ये मीडियाटेकचा एमटी पी२२ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ३ जीबी असून स्टोअरेजसाठी ३२ आणि ६४ जीबी असे पर्याय आहेत. याच्या मागील बाजूस १२ आणि ५ मेगापिक्सल्सचे कॅमेरे आहेत.
यामध्ये पीडीएएफ आणि इआयएस हे फिचर्स आहेत. तर यामध्ये कृत्रीम बुध्दीमत्तेवर आधारित पोट्रेर्र्ट मोडही दिलेला आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर आधारित मीयुआय ९.६ वर चालणारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *