pataakha-poster

विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘पटाखा’ या चित्रपटातील नवे गाणे रिलीज

मनोरंजन

विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘पटाखा’ या चित्रपटातील नवे गाणे ‘हॅलो हॅलो’ रिलीज करण्यात आले आहे. ‘छैय्या छैय्या’ गर्ल मलाईका अरोरा या गाण्याच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा आयटम साँगमध्ये थिरकताना दिसणार आहे. छैय्या छैय्या, मुन्नी बदनाम हुई, अनारकली डिस्को चली हे मलाईकाचे आयटम साँग हीट ठरले आहेत. मलाईका पहिल्यांदाच मधुर आवाज असलेल्या रेखा भारद्वाज यांच्या आयटम नंबरवर नाचताना दिसणार आहे. गुलजार यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत तर हे गाणे कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केले आहे. ‘पटाखा’मध्ये कॉमेडियन – अभिनेता सुनील ग्रोवर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *