ef36bc7329609b7aa4d96b5b6a156635

तेलंगणा विधानसभा विसर्जित

देश

तेलंगणा सरकार राज्यपाल ईएसएल नरसिंहम यांनी विसर्जित केल्यामुळे येथे मुदतपूर्व निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी याबद्दल निर्णय घेतला होता. यानंतर राव यांना पुढील सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्रीपदी कायम राहण्याची सूचना राज्यपालांनी केली.
तेलंगणाची निवडणूक या निर्णयामुळे आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. टीआरएसवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. टीआरएस पक्षाला वेगळी निवडणूक झाली, तर फायदा होईल, असा अंदाज टीआरएसचे नेते लावत असल्यामुळे मुदतपूर्व विधानसभा विसर्जित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तेलंगणा राज्याची स्थापना झाल्यानंतर पहिल्या विधानसभा निवडणुकांमध्ये केसीआर यांच्या पक्षाला बहुमत मिळाले होते. मे २०१४मध्ये झालेल्या या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाने ११९ जागांपैकी ६३ जागांवर विजय मिळवला होता.
येत्या डिसेंबरमध्ये मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोरम या चार राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यांच्याबरोबरच आता तेलंगाणा विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.
तेलंगणाच्या विधानसभेची मुदत जून 2019पर्यंत होती. पण आता तिथं वेळेआधी निवडणुका होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *