suresh prabhu

१७ ते २४ ऑक्टोबरदरम्यान २४ वी प्रादेशिक एकात्मिक आर्थिक भागीदारी ऑकलंड फेरी

देश व्यापार

नवी दिल्ली, ४ सप्टेंबर २०१८

सिंगापूर येथे ३०-३१ ऑगस्ट या दिवशी आयोजित सहाव्या प्रादेशिक एकात्मिक आर्थिक भागीदारी (आरसीईपी) मंत्रिस्तरीय बैठकीत वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. या बैठकीत सहभागी मंत्र्यांनी विविध गट आणि उपकार्यकारी गटांच्या कामांचा आढावा घेतला. आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्य, लघु आणि मध्यम उद्योग, अबकारी कर प्रक्रिया आणि व्यापारविषयक सुविधा तसेच शासकीय खरेदी या क्षेत्रांमध्ये चांगली प्रगती होत असल्याची दखल या बैठकीत घेण्यात आली.

सेवा क्षेत्राबद्दल बोलतांना दर्जामध्ये सातत्य राखण्याचे महत्त्व सुरेश प्रभू यांनी अधोरेखित केले. गुंतवणूक क्षेत्रात गुंतवणूकदार राज्य वाद निवाड्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. ऑकलंडमध्ये येत्या १७ ते २४ ऑक्टोबरदरम्यान आयोजित २४ व्या आरसीईपी ऑकलंड फेरीदरम्यान या सर्व मुद्यांसंदर्भातील वाटाघाटी मार्गी लावाव्या असे निर्देश बैठकीत सहभागी मंत्र्यांनी दिले.

या प्रादेशिक एकात्मिक आर्थिक भागीदारीत 16 देशांचा समावेश असून त्यात आशियान समुहातील १० देश सहभागी होणार आहेत. आतापर्यंत या भागीदारीच्या ६ मंत्रिस्तरीय बैठका झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *