644050-sea-link-bandra-worli-092217

वर्सोवा-वरळी अंतर १५ मिनिटांत गाठता येणार

मुंबई

पुढच्या पाच वर्षांत वर्सोवा-वरळी हे अंतर अवघ्या १५ मिनिटांत गाठता येणार आहे. वर्सोवा-वरळी सागरी मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला ऑक्टोबर २०१८ पासून सुरुवात होणार आहे.
येत्या पाच वर्षांत हे काम पूर्ण करण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. रिलायन्स-अस्टॅल्डी संयुक्त प्रकल्प आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यात बांधकाम करारनामा झाला आहे. प्रस्तावित कालावधीमध्ये हे काम पूर्ण झालं नाही तर दंड आकारला जाणार आहे. तसंच प्रस्तावित कालावधीच्या सहा महिने आधी प्रकल्प पूर्ण केल्यास अंदाजे साडेतीनशे कोटी रुपये बक्षीसही मिळणार आहे.
या मार्गामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडीतून मुंबईकरांना दिलासा मिळणार असून अवघ्या पंधरा मिनिटात वर्सोवा ते वरळी हे अंतर गाठता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *