rape1

धक्कादायक ! सावत्र आईचा कट,अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या

देश

जम्मू – काश्मीरमधील बारामुल्ला येथील नऊ वर्षांच्या मुलीच्या सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मुलीच्या सावत्र आईनेच हा कट रचल्याचे समोर आले आहे. मुलीच्या सावत्र भावासह तीन जणांनी त्या मुलीवर बलात्कार केला आणि यानंतर तिची निर्घृण हत्या केली. मुलीच्या मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी नराधमांनी मृतदेहावर अॅसिड टाकले.
बारामुल्ला जिल्ह्यातील बोनियार जंगलात नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला होता. मुलीची हत्या करण्यात आली होती आणि मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत नऊ जणांना अटक केली. यात मुलीच्या सावत्र आई आणि सावत्र भावाचा देखील समावेश आहे.
आरोपी महिलेचा पतीच्या दुसऱ्या पत्नी व तिच्या मुलांवर राग होता. पती दुसऱ्या पत्नी व तिच्या मुलांच्या संपर्कात होता. हे पहिल्या पत्नीला खटकत होते. याच रागातून तिने दुसऱ्या पत्नीच्या मुलीचा खात्मा करण्याची योजना आखली. यात तिने आपल्या मुलाची मदत घेतली. त्यानंतर २४ ऑगस्टला मुलगी बेपत्ता झाली. यामुळे कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरू केली. पण तिचा कसलाच ठावठिकाणा लागला नाही. यामुळे मुलीच्या आई-वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तेव्हापासून पोलीस मुलीचा शोध घेत होते. पण अखेर 2 सप्टेंबर रोजी बारामुल्ला येथील जंगलात मुलीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. मृतदेहावर मारहाणीच्या खुणा होता, तिचे डोळे फोडलेले होते.यानंतर तिच्या अंगावर अॅसिड टाकण्यात आले.
२४ ऑगस्ट रोजी महिला सावत्र मुलीला घेऊन जंगलाच्या दिशेने गेली. वाटेत काही वेळाने तिचा १४ वर्षांचा मुलगाही तिला भेटला. त्याच्यासोबत दोन मित्र होते.सर्व जण मुलीला घेऊन जंगलात गेले. तिथे सावत्र आईच्या डोळ्यादेखतच तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर चिमुकलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. तिचे डोळे देखील काढण्यात आले. यानंतर तिच्या अंगावर अॅसिड टाकण्यात आले. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले चाकू जप्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *